देशातील दूध उत्पादन १६३.७ दशलक्ष टनांवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली ः भारताने दूध उत्पादनात जगात अाघाडी घेतली अाहे. देशात २०१६-१७ वर्षात दूध उत्पादन १६३.७ दशलक्ष टनांवर पोचले अाहे. या दुधाचे मूल्य ४ लाख कोटी एवढे अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली अाहे.

ते बिहारमधील सेमवापूर, मोतिहारी येथे नुकत्याच झालेल्या पशू अारोग्य मेळ्यात बोलत अाहे. बिहारमध्ये गेल्या वर्षीत ८.२९ दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. हे उत्पादन देशातील एकूण दूध उत्पादनाच्या ५.३३ टक्के एवढे अाहे. बिहारमध्ये देशातील एकूण पशुधनांपैकी ६.७७ टक्के पशुधन अाहे. त्यासाठी बिहारमध्ये दूध उत्पादन अाणि उत्पादकता वाढविण्याची गरज कृषिमंत्री सिंह यांनी या वेळी व्यक्त केली अाहे.

दुग्धव्यवसाय हे उपजीविकेचे पारंपरिक स्राेत अाहे अाणि त्याचा कृषी व्यवस्थेशी जवळचा संबंध अाहे. देशात सध्या पशुधनांची संख्या १९ कोटी अाहे. देशातील एकूण पशुधनांपैकी भारतात १४ टक्के पशुधन अाहे. देशी पशुधन १५.१ कोटी एवढे अाहे. विशेषतः देशी जनावरे वातावरणातील बदलामुळे कमी प्रभावित होतात, असे सिंह यांनी सांगितले.

बिहारसाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत ६७ कोटी रुपये वितरित केले अाहेत. या योजनेमुळे दूध उत्पादन अाणि उत्पादकता वाढविण्यास मदत होणार अाहे, असेही ते म्हणाले.

देशातील दूध उत्पादन (दशलक्ष टनांमध्ये)

 
वर्ष उत्पादन
२०१०-११ १२१.८
२०११-१२ १२७.९
२०१२-१३ १३२.४ 
२०१३-१४ १३७.७
२०१४-१५ १४६.३
२०१५-१६ १५५.५

स्राेत ः दुग्धविकास, पशुसंर्वधन विभाग, कृषी मंत्रालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com