राज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप मोठी होईल.
ताज्या घडामोडी
मुंबई ः आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर भारतातील दरापेक्षा जास्त असल्याने बांगलादेश मका निर्यातीसाठी भारताला पसंती दिली आहे. बांगलदेशाने २०१८ मध्ये ७० ते ८० हजार टन मका भारतातून आयात केला अाहे, असे व्यापार सूत्रांनी सांगितले.
मुंबई ः आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर भारतातील दरापेक्षा जास्त असल्याने बांगलादेश मका निर्यातीसाठी भारताला पसंती दिली आहे. बांगलदेशाने २०१८ मध्ये ७० ते ८० हजार टन मका भारतातून आयात केला अाहे, असे व्यापार सूत्रांनी सांगितले.
भारतीय बाजारात यंदा मक्याचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजाराेक्षा कमी आहेत. पीककाढणीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आर्द्रता आणि दर्जा यावर परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मक्याला चांगला दर मिळत असला तरी कमी दर्जाचा मका हा १००० रुपये प्रतिक्विंटलपासून बाजारत विकला जात आहे. त्यामुळे देशातील पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगाची गरज भागविण्यासाठी बांगलादेशने भारतीय मक्याला पसंती दिली आहे. निर्यात मालापैकी एप्रिलमध्ये ३० हजार टन, तर मे महिन्यात ४० ते ५० हजार टन निर्यात केली आहे, असे गुलबर्गा येथील एका व्यापाऱ्याने सांगितले.
कोलकाता येथील एका व्यापाऱ्याने सांगितले, की निर्यातीसाठीच्या मका पिकाला सरासरी २०० डॉलर प्रति टन दर मिळत आहे. बांगलादेश दोन वर्षानंतर भारताकडून मका आयात करीत अाहे. व्यापारी माल मोठ्या प्रमाणात रेल्वे अाणि मालवाहू वाहनांद्वारे पाठवतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त दर
मका प्रामुख्याने तेथील पोल्ट्री व्यवसायात खाद्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात अाहे. मका पिकाला जागतिक बाजारपेठेत चांगला बाजारभाव अाहे. बांगलादेश अाघाडीवरील आयातदार असून तो यावर्षी भारताकडून मका आयात करीत अाहे, असे गुलबर्गा येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतीय मक्याचे दर ब्राझिलच्या तुलनेत प्रतिटन १० ते १५ डॉलरने स्वस्त अाहेत.
- 1 of 349
- ››