agriculture news in marathi, The India Grape Harvest Wine Festival started | Agrowon

इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिव्हलला सुरवात
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

लखमापूर, जि. नाशिक  : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलला दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे शुक्रवारी (ता. ९) मोठ्या दिमाखात सुरवात झाली. सदर महोत्सवानिमित्त ११ मार्चपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लखमापूर, जि. नाशिक  : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलला दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे शुक्रवारी (ता. ९) मोठ्या दिमाखात सुरवात झाली. सदर महोत्सवानिमित्त ११ मार्चपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

इंडिया ग्रेप हारवेस्ट वाइन फेस्टिव्हलचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे, आमदार अनिल कदम, माजी आमदार माणिकराव कोकाटे, ‘सह्याद्री’चे विलासराव शिंदे, पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील, कैलास भोसले, मानद सचिव रवींद्र बोराडे, जगन खापरे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे माजी जि.प. गटनेते प्रवीण जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. प्रास्तविक इंडियन ग्रेप फेस्टिव्हलचे आयोजक जगदीश होळकर यांनी केले.

या वेळी बोलताना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शेतीमालाचे विपणन थेट ग्राहकांपर्यंत होणे गरजेचे असून, ‘सह्याद्री’ने शेतकऱ्यांना एकत्र आणत चालविलेले प्रयत्न कौतुकास्पद असून, जगदीश होळकर यांनीही वाइन उद्योगासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, दोघांनीही आपले वाईन व कृषिमालाचे थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी शहरात आउटलेट सुरू करावे, असे आवाहन केले.

वेगवेगळ्या शेतीमालाची व्हावी इंडस्ट्री
जगभरात द्राक्षामुळे नाशिकची नवी ओळख निर्माण झाली असून, ग्रेप फेस्टच्या निमित्ताने जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन यास चालना मिळणार असून, जिल्ह्यातील शेतकरी सर्वच शेतीमाल उत्पादनात अग्रेसर आहे. सह्याद्रीने शेतकऱ्यांना एकत्रित करत त्यांच्या शेतीमालाला अधिक भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून, जशी साखर उद्योग ही इंडस्ट्री झाली, तसेच प्रत्येक शेतीमालासाठी इंडस्ट्री उभी करण्याची गरज असल्याचे सह्याद्रीचे विलास शिंदे यांनी सांगितले.

इतर बातम्या
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
दिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...
खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...
केन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
नाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...
दसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...