Agriculture News in Marathi, India groundnut crop estimate to 7 mln tn, USDA Report | Agrowon

भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि उत्पादकतेत सुधारणा यामुळे भारतातील भुईमूग उत्पादनात वाढ होऊन ते यंदा (२०१७-१८) ७ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला अाहे.

याअाधी भारतात भुईमूग उत्पादन ६.६ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याता अाता अाणखी वाढ होणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. गेल्या वर्षी भारतात ६.३ दशलक्ष टन अंदाजित उत्पादन झाले होते.

नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि उत्पादकतेत सुधारणा यामुळे भारतातील भुईमूग उत्पादनात वाढ होऊन ते यंदा (२०१७-१८) ७ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला अाहे.

याअाधी भारतात भुईमूग उत्पादन ६.६ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याता अाता अाणखी वाढ होणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. गेल्या वर्षी भारतात ६.३ दशलक्ष टन अंदाजित उत्पादन झाले होते.

देशात खरीप हंगामात जून- जुलै महिन्यात भुईमूग लागवड केली जाते. तर सप्टेंबर- अाॅक्टोबर दरम्यान भुईमूग पिकाची काढणी केली जाते. यंदा ५.२ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली होती. खरिपात पीक क्षेत्र वाढले. त्यात पोषक हवामान अाणि कीड प्रादुर्भाव कमी झाल्याने अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता अाहे.

देशातील भुईमुगाचे प्रतिहेक्टरी उत्पादन २ टनांपर्यंत पोचण्याची शक्यता अाहे. याअाधी प्रतिहेक्टरी उत्पादन १.८५ टनांपर्यंत पोचणार असल्याचे संकेत देण्यात अाले होते. अाता सुधारीत अंदाज अहवालात उत्पादन वाढणार असल्याचे स्पष्ट केले अाहे.

भुईमूग उत्पादनात गुजरात अाघाडीवर अाहे. मात्र, या राज्यात जुलैमध्ये अालेल्या पुराचा काही प्रमाणात पिकाला फटका बसला अाहे. यामुळे गुजरातमधून मर्यादित उत्पादन मिळणार अाहे. येथील काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची पूर्नलागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी पुरामुळे चारापिके, कडधान्ये पिके घेतली अाहेत, असे ‘यूएसडीए’ने अहवालात म्हटले अाहे.

शेतकऱ्यांचा कडधान्ये पिकांकडे कल
भारतात खरीप हंगामात तेलबियांची लागवड कमी क्षेत्रावर झाली होती. येथील शेतकरी तेलबिया पिकांकडून कापूस, कडधान्ये, भाजीपाला पिकाकडे वळले अाहे. अनियमित पाऊस, कोरड्या हवामानामुळे लागवड उशीरा झाली, असे ‘यूएसडीए’ने म्हटले अाहे.

भारतातील भुईमूग उत्पादन अंदाज (२०१७-१८)

  • एकूण उत्पादन...७ दशलक्ष टन
  • प्रतिहेक्टरी उत्पादन...२ टन

         स्त्रोत ः यूएसडीए
 

इतर अॅग्रोमनी
कांद्यातील नरमाई किती काळ?कां द्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...
सरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...
गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...
कशी रोखणार पुरवठावाढ?शेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...
साखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...
एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...
मक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...
तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...
चीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधीनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक...
सरासरी मॉन्सूनमुळे २८.३ दशलक्ष टन...नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या...
मका वगळता सर्व पिकांच्या भावात वाढया सप्ताहात हळद, गहू व गवार बी यांच्यातील किरकोळ...
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
आंबा निर्यातीला सुरवातपुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....