agriculture news in marathi, India to have Agriculture assistance of Netherlands | Agrowon

नेदरलॅंडचे भारताबरोबर कृषी संशोधनासाठी सहकार्य
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

बारामती, जि. पुणे : भारतातील चौथ्या क्रमांकाचा परकीय गुंतवणूकदार देश असलेल्या नेदरलॅंडचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, १५ खात्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तब्बल २२० उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ २३ ते २५ मे या कालावधीत भारतात येत आहे. कृषी विकासातील सर्वांत मोठे करार वर दौऱ्यादरम्यान होणार आहेत. या दौऱ्याचा समारोप बारामतीतील सेंटर फॉर एक्सलंस-डेअरी या केंद्राच्या भूमिपूजनाने होणार आहे.

बारामती, जि. पुणे : भारतातील चौथ्या क्रमांकाचा परकीय गुंतवणूकदार देश असलेल्या नेदरलॅंडचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, १५ खात्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तब्बल २२० उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ २३ ते २५ मे या कालावधीत भारतात येत आहे. कृषी विकासातील सर्वांत मोठे करार वर दौऱ्यादरम्यान होणार आहेत. या दौऱ्याचा समारोप बारामतीतील सेंटर फॉर एक्सलंस-डेअरी या केंद्राच्या भूमिपूजनाने होणार आहे.

डच पंतप्रधान मार्क रूट, उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन आणि त्यांचे शिष्टमंडळ २३ मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. संपूर्ण देशात नेदरलॅंड कृषी, स्मार्ट सिटी, जलव्यवस्थापन, आरोग्य आणि संशोधन व विकास या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. त्याचे विविध करार वेगवेगळ्या राज्यांमध्ये केले जाणार आहेत. हरियानात गुडगाव येथे फुलबाजार, कर्नाल येथील महाराणा प्रताप फलोत्पादन विद्यापीठातही सफरचंदाच्या उच्च, दर्जेदार व उत्पादनवाढीसाठी प्रकल्प आणि महाराष्ट्रात बारामती येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत राज्यातील सर्वांत मोठा व भविष्यातील दुग्धोत्पादनात आशादायक क्रांती आणणारा सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी हा गुणवत्तापूर्ण गोवंश सुधार प्रकल्प उभा राहणार आहे. 

    भारत नेदरलॅंडकडून शेती तंत्रज्ञान, कृषी संशोधनातील देवाणघेवाण, उच्च प्रतीचे बियाणे निर्मिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे. भारतातील शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने नेदरलॅंडकडून हे सहकार्य घेतले जाणार आहे. भारतातील सफरचंद पाच वर्षांत उत्पादनायोग्य होतात, मात्र नेदरलॅंडमध्ये सफरचंदाचे उत्पादन ११ महिन्यांतच मिळू लागते, भारतातील टोमॅटोसारख्या पिकांना १ चौरस मीटरमध्ये १० किलोपर्यंत उत्पादन मिळते, मात्र तेवढ्याच क्षेत्रफळात ५० किलोपर्यंत उत्पादन मिळविणाऱ्या जाती व पीक तंत्र नेदरलॅंडने विकसित केले आहे. ते भारतात विकसित करण्यासाठी अगोदरच काही करार झालेले आहेत. आता २३ मे ते २५ मेपर्यंत नव्याने आणखी मोठे करार करून भारतीय शेतीत क्रांती करण्याचे पाऊल उचलले जाणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...