agriculture news in marathi, India-Israel Ties Set To Expand in Diverse Sectors | Agrowon

भारत-इस्राईलमध्ये कृषी, जल व्यवस्थापन सहकार्य
वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नवी दिल्ली : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर अाहेत. सोमवारी (ता. १५) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी कृषी, जल व्यवस्थापनासह नऊ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सौरऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत.

नवी दिल्ली : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर अाहेत. सोमवारी (ता. १५) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी कृषी, जल व्यवस्थापनासह नऊ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सौरऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत.

भारत आणि इस्राईलदरम्यान नऊ सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्राईल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. तसेच सायबर सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील करारांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यंदाचे वर्ष हे भारत व इस्राईल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे २५ वे वर्ष आहे. नेतन्याहू यांच्यासोबत मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे.

भारत व इस्राईलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि प्रगतीसाठी मिळून काम करूया.
- बेंजामिन नेतन्याहू, पंतप्रधान, इस्राईल

दोन्ही देशांमध्ये चित्रपट, स्टार्टअप इंडिया, संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत सहमती झाली आहे. आगामी काळात दोन्ही देश एकमेकांच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करतील, अशी मला आशा आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत

इतर अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....