भारत हवामान बदलाला सर्वांत संवेदनशील

हवामान बदल
हवामान बदल

लंडन ः भारत हा जागातील सर्वांत जास्त हवामान बदलाला संवेदनशील देश असून, संवेदनशील असलेल्या देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. देशात हवामान बदलाचा परिणाम लगेच शेतीवर होतो. भारतानंतर पाकिस्तान, फिलिपिन्स आणि बांगलादेशचा नंबर लागतो, अशी माहिती ‘एचएसबीसी’ने प्रकाशित केलेल्या अहवालातून पुढे आली आहे. एचएसबीसी बॅंकेने जगातील हवामान बदलाचा परिणाम होणाऱ्या ६७ विकसित, उदयोन्मुख आणि आघाडीच्या बाजारपेठ असलेल्या देशांचा अभ्यास केला आहे. एचएसबीसीने अभ्यास केलेल्या ६७ देश हे जगातील जवळपास एकतृतीयांश आहेत. या देशांमध्ये जगातील ८० टक्के लोकसंख्या राहते आणि जागतिक सकल उत्पन्नात या देशांचा ९४ टक्के वाटा आहे. देशांची क्रमवारी काढताना एचएसबीसीने त्या त्या देशातील प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करून गुण दिले आहेत. काही देशांमध्ये काही भाग हे हवामान बदलासाठी अति संवेदनील होते, तर काही भाग कमी संवेदनशील होते, त्यामुळे त्या देशाची क्रमावारी कमी आली. त्याऊलट काही देशांमध्ये अनेक भागांत समान पातळीवर संवेदनशीलता आढळून आली त्यामुळे त्या देशाची क्रमवारी जास्त आली. एचएसबीसीने भारत, पाकिस्तान, फिलिपिन्स आणि बांगलादेश हे देश सर्वाधिक संवेदनशील ठरले आहेत.  ‘‘भारत हा सर्वाधिक हवामान बदल संवेदनशील देश असून, हवामान बदलामुळे देशात बदलत्या परिस्थितीने शेती उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा कोरडवाहू शेतीला बसणार आहे. कमी पाऊस, दुष्काळ, अति पाऊस, वाढते तापमान यामुळे कोरडवाहू शेती प्रभावित होईल. तसेच पाकिस्तान, फिलिपिन्स आणि बांगलादेशसुद्धा हवामान बदलाला संवेदनक्षम असून, या देशांमध्ये हवामान बदलासोबतच वादळ आणि पूर यांसारख्या अपत्ती ओढावतील. पाकिस्तान हा देश हवामान बदलाच्या परिणामांवर उपाय करण्यासाठी लागणाऱ्या साधनांच्या उपलब्धतेमध्ये सर्वात खालच्या पातळीवर आहे,’’ असे एचएसबीसीने म्हटले आहे. हवामान बदलाला संवेदनशील असलेल्या पहिल्या १० देशांमध्ये दक्षिण आणि आग्नेय अशिया देशातील आहेत. ओमान, श्रीलंका, कोलंबिया, मेक्सिको, केनिया आणि दक्षिण आफ्रिका हे देश या सुद्धा या यादीत आहेत. तसेच फिनलॅंड, स्विडन, नाॅर्वे, इस्टोनिया आणि न्यूझीलॅंड हे पहिले पाच सर्वांत कमी संवेदनशील देश आहेत.  हवामान बदलाची स्थिती

  •  जी-२० देशांमध्ये भारत सर्वाधिक संवेदनशील देश
  •  हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कोरडवाहू शेतीला बसणार
  •  पाकिस्तान, फिलिपिन्स आणि बांगलादेशही यादीत
  •  पाकिस्तान संसाधनांच्या उपलब्धेत खालच्या पातळीवर
  •  संवेदनशील देशांमध्ये पहिले पाच देश दक्षिण आणि आग्नेय अशियातील
  •  फिनलॅंड, स्विडन, नाॅर्वे, इस्टोनिया आणि न्यूझीलॅंड कमी संवेदनशील
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com