agriculture news in Marathi, India poultry expo in nashik from 27 january, Maharashtra | Agrowon

नाशिकला २७ पासून ‘इंडिया पोल्ट्री एक्‍स्पो’
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नाशिक : कुक्कुटपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाची सर्वव्यापी माहिती देणारे तीनदिवसीय ‘इंडिया पोल्ट्री एक्‍स्पो’ नाशिक येथील ठक्कर डोम येथे शनिवार (ता. २७) ते सोमवार (ता. २९)दरम्यान होणार आहे. 

नाशिक : कुक्कुटपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाची सर्वव्यापी माहिती देणारे तीनदिवसीय ‘इंडिया पोल्ट्री एक्‍स्पो’ नाशिक येथील ठक्कर डोम येथे शनिवार (ता. २७) ते सोमवार (ता. २९)दरम्यान होणार आहे. 

शनिवारी (ता. २७) सकाळी १० वाजता राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. या वेळी राज्याचे जलसंपदामंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब थोरात, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, वेंकटेश्‍वरा हॅचरीजचे महाव्यवस्थापक डॉ. पी. जी. पेडगावकर, पोल्ट्री ब्रीडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार उपस्थित राहणार आहे. 

या प्रदर्शनात राज्य शासन व पोल्ट्री व्यावसायिक यांच्या वतीने कुक्कुटपालन व्यवसायातील संधींबरोबरच पक्ष्यांचे रोग, आजार, पोषण तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. कुक्कुटपालन उद्योगासंबंधित सर्व उपकरणे, तंत्रज्ञान, साहित्य याची प्रात्यक्षिके या प्रदर्शनात असतील. विविध तंत्रज्ञानाची ५० हून अधिक स्टॉल्स असतील. राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील उद्योजक यात सहभागी होणार आहेत. शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीपल फॉर पोल्ट्री यांच्यातर्फे करण्यात आले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायमपुणे  : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे...
ब्रॉयलर्स बाजार वर्षातील उच्चांकी...गेल्या आठवड्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार...
उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढवाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये...
शाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा...शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस...सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली)...
पाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६...पुणे  ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील...
मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत ७.७९...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने राबविली अर्ज...यवतमाळ : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानापोटी नगरला...नगर ः कपाशीवर झालेल्या बोंड अळी प्रार्दुभावाच्या...
नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता...
कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा...पुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग...
बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप...पुणे : महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन...
अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर...भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले...
शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस...नागपूर : शिवसेनेने भाजप सोबत युती केली नाही...
शेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य...
सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला...अतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी...
सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट...महाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण...
प्रशासकीय अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय...‘शेतीपूरक व्यवसाय करा त्यातून आर्थिक स्थैर्य...
अतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल :...राज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे....
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...