आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले : संयुक्त राष्ट्र अहवाल

आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले : संयुक्त राष्ट्र अहवाल
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले : संयुक्त राष्ट्र अहवाल

न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. जगभरातील सर्वांत आनंदी देशांच्या यादीत यंदा भारताचे स्थान सातने घसरून १४० वर आले आहे. फिनलॅंड मात्र या यादीत सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थानी आहे. जागतिक आनंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी (ता. २०) हा अहवाल प्रसिद्ध केला. उत्पन्न, स्वातंत्र्य, विश्वास, निरोगी आयुर्मान, सामाजिक पाठबळ आणि उदारता या सहा प्रमुख निकषांवर हा अहवाल बेतलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरातील आनंद दुरावत चालला असून, लोकांमध्ये नकारात्मक, द्वेषभावना वाढीस लागल्याचे या पाहणीत समोर आले आहे. २०१८ मध्ये या यादीत १३३ व्या स्थानावर असलेला भारत यंदा १४० व्या स्थानावर आला आहे. फिनलॅंड पहिल्या स्थानी कायम असून, त्यापाठोपाठ डेन्मार्क, नॉर्वे, आइसलॅंड, नेदरलॅंड या देशांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तान, टांझानिया, रवांडा अशा युद्धग्रस्त देशांतील लोक सर्वांत दुःखी असल्याचे अहवालात म्हटले आहे. इतर देश   अमेरिका ः १९   चीन ः ९३   पाकिस्तान ः ६७   बांगलादेश ः १२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com