agriculture news in marathi, India-Singapore to strengthen Economic Relations | Agrowon

भारत-सिंगापूर आर्थिक संबंध दृढ करणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

सिंगापूर : द्वीपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि संरक्षण संबंध वाढविण्याबाबत भारत आणि सिंगापूर यांच्यात एकमत झाले आहे. या दोन देशांमध्ये आज विविध आठ करारही करण्यात आले.

सिंगापूर : द्वीपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि संरक्षण संबंध वाढविण्याबाबत भारत आणि सिंगापूर यांच्यात एकमत झाले आहे. या दोन देशांमध्ये आज विविध आठ करारही करण्यात आले.

सिंगापूर दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्यात शुक्रवार (ता. १) विविध मुद्यांवर चर्चा झाली. भारत-प्रशांत महासागर भागात व्यापारासाठी शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत कठिण परिस्थितीतही भारत आणि सिंगापूरमधील संबंध टिकून राहिल्याचे मोदी यांनी या चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. दोन देशांमधील सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराचा दुसऱ्यांदा यशस्वीरित्या आढावा घेतला असला तरी या करारात लवकरच सुधारणा केली जाईल, असे मोदी म्हणाले.

सध्या सायबर सुरक्षा आणि दहशतवाद वाढत असल्याने या क्षेत्रातही सहकार्याची आवश्‍यकता असल्याचे मोदी म्हणाले. विविध प्रकल्पांसाठी भारतातील राज्ये सिंगापूरमधील कंपन्यांचे सहकार्य घेत असल्याबद्दल ली सेन लुंग यांनी आनंद व्यक्त केला. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती सिंगापूरमधील कंपनीच्या मदतीने साकारली जात आहे, तर पुण्यातील विमानतळाचा विकास करण्यासाठीही महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

सिंगापूर दौऱ्यातील ठळक घटना
 सिंगापूरमधील प्रसिद्ध नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला (एनटीयू) नरेंद्र मोदींनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन संकल्पनांची गरज असल्याचे मोदी या वेळी म्हणाले. या वेळी भारतातील काही विद्यापीठे, संस्था आणि "एनटीयू' दरम्यान सहा करार करण्यात आले.

 सिंगापूरचे माजी राजनैतिक अधिकारी टॉमी कोह यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींनी त्यांना दिला. यंदाच्या पुरस्कारप्राप्त दहा "आसियान'मधील व्यक्तींपैकी कोह हे एक आहेत. कोह हे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघात सिंगापूरचे राजदूत होते. चीन, जपान आणि भारताबरोबरील धोरणात्मक चर्चा सुरू होण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

 भारत आणि सिंगापूरमध्ये "फायनान्शिअल टेक्‍नॉलॉजी'संबंधी संयुक्त कृती गट स्थापन करण्याबाबत दोन्ही देशांत एकमत झाले. डिजिटल इंडिया आणि देशभरात "आधार'ची यशस्वी अंमलबजावणी यामुळे भारत ही सिंगापूरमधील "फायनान्शिअल टेक्‍नॉलॉजी' क्षेत्रातील कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ असल्याचे ली सेन लुंग म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...