agriculture news in marathi, India towards Reform to Transform Say PM Narendra Modi | Agrowon

‘रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म’ भारताची वाटचाल : पंतप्रधान
वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नवी दिल्ली : भारताची वाटचाल 'रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म' (बदलासाठी सुधारणेच्या दृष्टीने) वाटचाल सुरु आहे. आमच्या सरकारने जीएसटीच्या माध्यमातून भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प केला. त्यादृष्टीने देशात आकारले जाणारे विविध करांचे जाळे नष्ट करण्यात आले असून, देशाचे एकीकरण करण्यात आले आहे. सध्या कोणत्याही क्षेत्रात बदल केला नाही, असे एकही क्षेत्र नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज येथे केले. तसेच भारत 'ट्रान्सफॉर्म' होत असून, भारताबाबत जगाचा दृष्टीकोन सकारात्मक होत आहे, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : भारताची वाटचाल 'रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म' (बदलासाठी सुधारणेच्या दृष्टीने) वाटचाल सुरु आहे. आमच्या सरकारने जीएसटीच्या माध्यमातून भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प केला. त्यादृष्टीने देशात आकारले जाणारे विविध करांचे जाळे नष्ट करण्यात आले असून, देशाचे एकीकरण करण्यात आले आहे. सध्या कोणत्याही क्षेत्रात बदल केला नाही, असे एकही क्षेत्र नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज येथे केले. तसेच भारत 'ट्रान्सफॉर्म' होत असून, भारताबाबत जगाचा दृष्टीकोन सकारात्मक होत आहे, असेही ते म्हणाले.

'प्रवासी संसद संमेलना'त पंतप्रधान बोलत होते. या संमेलनात 23 देशांचे 140 हून अधिक खासदार उपस्थित होते. यामध्ये ब्रिटेन, कॅनडा, फिजी, केनिया, मॉरिशियस, न्यूझीलंड आणि श्रीलंकेतील खासदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, या संमेलनाचा उद्देश प्रवासी भारतीयांचा संबंध मजबूत व्हावा, असा आहे. भारताने अनेक देशांना मदत केली. नेपाळ, श्रीलंकेमध्ये आलेल्या पूरात भारताने मदत केली. यमनमध्ये संकट आले, तेव्हा 4500 नागरिकांना आम्ही वाचवले. 48 देशांतील जवळपास 2 हजार लोकांना वाचवण्यात आले. भारत 'सबका साथ सबका विकास' यावर काम करत आहे.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून स्किल योजना, स्टँडअप योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप योजना सुरु करण्यात आल्या आहेत. देशातील युवकांना 4 लाख कोटींचे कर्जे देण्यात आली आहेत.

9 जानेवारी रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परत आले होते. त्यामुळे आता हा दिवस 'प्रवासी दिवस' म्हणून साजरा केला जात आहे. या संमेलनात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, अमेरिकेत सध्या सिनेट सभा सुरु असल्याने अमेरिकेचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहू शकला नाही. तसेच प्रवासी संसद समेलनच्या माध्यमातून भारताचे नाव जगभरात झाले आहे.

भारताने जगाभरात नेहमी सकारात्मक भूमिका बजावली आहे. आमची दुसऱ्या देशाच्या सीमेवर नजर नाही. आशियाई देशातील संबंध मजबूत होत आहेत. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीच्या आशियाई पाहुणे असतील. या संसद संमेलनाचे एक सत्र राज्यसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, दुसरे सत्र लोकसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

दरम्यान, भारताबाबत जागतिक बँक, आयएफएम आणि मूडीजचाही दृष्टीकोन सकारात्मक बनत आहे. व्यापार करण्यासाठी आम्ही नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. 'ग्लोबल इनोव्हेशन इन्डेक्स'मध्ये 21 अंकाची सुधारणा केली, असेही मोदी म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...