यंदा साखर उत्पादनात भारत ठरणार अव्वल

साखर
साखर

नवी दिल्ली ः भारत २०१८-१९ च्या गाळप हंगामात ब्राझीलला मागे टाकत ३५० लाख टन साखर उत्पादनासह क्रमांक एकचा देश ठरणार आहे. विक्रमी साखर उत्पादनासह ब्राझील आतापर्यंत अव्वल होता. मात्र ब्राझीलने वाढत्या तेलाच्या किमती आणि घटते साखर दर यामुळे धोरणात बदल करत इथेनॉलनिर्मितीवर भर दिला असल्याने साखर उत्पादन २७० लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

भारतात इथेनॉलनिर्मितीची क्षमता कमी आहे. भारतात साखर उद्योग हा राजकारणाच्या दृष्टीने खूपच संवेदनशील भाग आहे. वेळोवेळी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या जोरावर यंदा देशात ३५० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. न्यूयॉर्कमध्ये तेलाच्या किमती वाढत आहे आणि साखरेच्या किमती दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे ब्राझीलने आपल्या धोरणात बदल करत उसासाठी दिले जाणारे अनुदान कमी करून इथेनॉलनिर्मितीवर भर दिला आहे. २०१८-१९ च्या हंगामात येथील जास्तीत जास्त ऊस इथेनॉलनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन १०० लाख टनांनी घटून ३०० लाख टन होईल, असा अंदाज आहे.  भारतात साखरेची २५० लाख टन मागणी असते आणि उत्पादन ३५० लाख टन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठ्याचा प्रश्न भारत कसा सोडविणार हा मोठा प्रश्न आहे. कारण आशियात ब्राझीलनंतर थायलंड हा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश आहे. येणाऱ्या हंगामात ब्राझीलची निर्यात ९० लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. भारताला अतिरिक्त पुरवठ्याची समस्या सोडवायची असेल तर निर्यात करणे अनिवार्य आहे. परंतु, थायलंड हा महत्त्वाचा निर्यातदार म्हणून पुढे आला आहे. 

निर्यातीसाठी सरकार प्रयत्नशील ‘‘देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभार बनला आहे. यावर उपाय करण्यासाठी निर्यात आवश्यक आहे. साखर उद्योगाच्या मागणीकडे सकारात्मकपणे सरकार पाहत आहे. निर्यातीसंबंधी निर्णय घेताना उद्योगाशी चर्चा करण्यात येईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. 

दरात मोठी तफावत भारातील बहुतेक कारखाने हे पांढरी साखर उत्पादित करतात. या साखरेला कमी मागणी असते. खूपच कमी कारखाने कच्च्या साखरेचे उत्पादन करतात. ही साखर आंतरराष्ट्रीय बाजारात सहजपणे विकली जाते. सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील किमतीत खूपच फरक आहे. त्यामुळे केंद्राने ठरवून दिलेला निर्यात कोटाही अनेक कारखाने पूर्ण करू शकत नाहीत, असे ‘विस्मा’चे बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. सध्या साखरेची निर्यात किंमत ही ३३० डॉलर प्रतिटन आहे तर अनेक कारखाने ४३० प्रतिटन डॉलरने विक्रि करत आहेत, असे मुंबई येथील एका व्यापाऱ्याने सांगितले.  ४५० लाख टन साखर पुरवठा होईल सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमती खुपच कमी आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांना सरकारने ठरवून दिलेला निर्यातीचा कोटाही पुर्ण करता आला नाही. देशातील कारखाने गाळप सुरू करतील तेव्हा २०१७-१८ च्या हंगामातील १०० लाख टन साखर शिल्लक असेल. त्यामुळे अतिरिक्त साखर निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या विपणन वर्षात ७० लाख टन साखर निर्यात बंधनकारक करण्याची मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) सरकारकडे केली आहे. अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होईल ‘इस्मा’ने जाहीर केलेल्या अंदाजाप्रमाणे देशात २०१७-१८ मधील १०० लाख टन साखर २०१८-१९ च्या हंगामात शिल्लक राहणार आहे. तसेच २०१८-१९ मध्ये ३५० लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे गाळप हंगामातील उत्पादन आणि शिल्लक साखर असा एकूण ४५० लाख टन पुरवठा होणार आहे. परंतु देशात २५० लख टन साखरेलाच मागणी असते. त्यामुळे २०१८-१९ च्या हंगामात २०० लाख टन अतिरिक्त साखर पुरवठा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com