agriculture news in marathi, India would largest import cotton in ten years | Agrowon

दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे संकेत
चंद्रकांत जाधव
रविवार, 21 जानेवारी 2018

जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक दाक्षिणात्य राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीने कापसावर प्रादुर्भाव केला. त्याचा फटका जगभरातील कापूस बाजारपेठांना बसला असून, देशाचा कापूस ताळेबंदच बिघडला आहे. देशात फरदड कापूस येणार नाही हे गृहीत धरून दक्षिण भारतातील सूतगिरण्यांसह कापड उद्योगांनी कापूस (रुई) आयातीचा धडाका सुरू केला आहे. यामुळे देशात यंदा एक दशकानंतर प्रथमच सर्वाधिक कापूस आयात होणार असून, ही आयात १८ लाख गाठींवर जाईल, असे संकेत कापूस बाजारपेठेतील तज्ज्ञ, निर्यातदारांनी दिले आहेत.

जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक दाक्षिणात्य राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीने कापसावर प्रादुर्भाव केला. त्याचा फटका जगभरातील कापूस बाजारपेठांना बसला असून, देशाचा कापूस ताळेबंदच बिघडला आहे. देशात फरदड कापूस येणार नाही हे गृहीत धरून दक्षिण भारतातील सूतगिरण्यांसह कापड उद्योगांनी कापूस (रुई) आयातीचा धडाका सुरू केला आहे. यामुळे देशात यंदा एक दशकानंतर प्रथमच सर्वाधिक कापूस आयात होणार असून, ही आयात १८ लाख गाठींवर जाईल, असे संकेत कापूस बाजारपेठेतील तज्ज्ञ, निर्यातदारांनी दिले आहेत.

भारत जगातील आघाडीचा कापूस निर्यातदार देश आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया कापूस निर्यातदार देशांच्या रांगेत भारत आहे. परंतु यंदा गुलाबी बोंड अळीमुळे देशात कापूस दरवाढ १२ टक्के झाली. जगाच्या कापूस बाजारात ही दरवाढ सात टक्के आहे. दुसऱ्या बाजूला मागील वर्षाच्या तुलनेत डॉलर रुपयाच्या तुलनेत कमजोर दिसत असून, तब्बल पाच ते साडेपाच रुपयांनी डॉलरचे मूल्य कमी झाले आहे. महाराष्ट्र, सीमांध्र, तेलंगण, मध्य प्रदेशात कापसावर गुलाबी बोंड अळी आल्याने देशाचा कापूस उत्पादनाचा ताळेबंद चुकला आहे.

सुरवातीला ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. आता ३४० ते ३५० लाख गाठींपर्यंतच उत्पादन होईल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी म्हटले आहे. यामुळे सर्वाधिक कापडमिला असलेल्या दाक्षिणात्य भागाला जबर फटका बसला असून, फरदडचे कापूस पीक येणार नाही म्हणून तेथील सूतगिरण्यांसह आघाडीच्या कापड उद्योगांनी रुईची आयात सुरू केली आहे. 

आठ लाख गाठींची आयात
आजघडीला आठ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आयात झाली आहे. दरवर्षी कापूस हंगामाअखेर म्हणजेच १ ऑक्‍टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत सहा ते सात लाख गाठींची आयात व्हायची. परंतु यंदा कापूस हंगाम सुरू होऊन चार महिनेही पूर्ण झालेले नसताना आठ लाख गाठींची आयात झाली. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुमारे १८ लाख गाठींची आयात होईल, असा अंदाज आहे. यामुळे मागील १० ते ११ वर्षानंतर प्रथमच सर्वाधिक कापूस आयात भारतात होईल, असे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

अमेरिकेकडून दहा टक्के रकमेवर आयात
देशात मागील ३५ दिवसांपासून कापूस दर स्थिर आहेत. ३८ हजारांना विकली जाणारी खंडी (३५६ किलो रुई) ४१ हजार रुपयांवर पोचली आहे. अशातच अमेरिकेकडून खंडी आगाऊ १० टक्के रक्कम देऊन दाक्षिणात्य आयातदारांना मिळत आहे. १० टक्‍क्‍यांपुढील उर्वरित रक्कम पुढील वित्तीय वर्षात देण्याचा वायदा करून अमेरिकेकडून देशात कापूस आयात सुरू आहे. पुढे दरवाढ झाली तरी सध्या जे दर आहेत, तेच देण्याच्या अटीवर हे सौदे झाले असून, आजच पूर्ण रक्कम द्यायची नाही, त्यामुळे आयातदारांना परदेशातून आयात परवडणारी ठरत आहे. रुपया मजबूत होत असल्याने निर्यातीवर परिणाम झाला असून, १९ लाख गाठींची निर्यात झाली आहे. 

पाकिस्तानला पाच लाख गाठी निर्यात
भारताचा कट्टर शत्रू असलेला पाकिस्तान भारतातील कापसाचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असून, तेथे सुमारे पाच लाख गाठींची निर्यात झाली आहे. सर्वाधिक साडेसात लाख गाठींची निर्यात बांगलादेशात झाली आहे. यासोबत इंडोनेशिया, व्हिएतनाम व काही प्रमाणात कझाकिस्तानमध्येही भारतातून कापूस निर्यात झाली असून, हंगामाअखेर ५० लाख गाठींची निर्यात अपेक्षित असल्याचे कापूस निर्यातदार दिनेश हेगडे (मुंबई) यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले. 

ताळेबंद चुकला
भारतात ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. आता ३४० ते ३५० लाख गाठींचे उत्पादन शक्‍य आहे. ३२५ लाख गाठींची स्थानिक गरज होती. ही गरज भागविण्यासाठी आयातीचा धडाका आतापासून सुरू झाला आहे. ५० लाख गाठींची निर्यात अपेक्षित होती. सध्या निर्यातीला फारशी चालना नाही. ४० ते ४२ लाख गाठी कॅरी फॉरवर्ड (शिल्लक) म्हणून अपेक्षित होत्या, परंतु किती गाठी शिल्लक राहतील, हे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाने कुणीही स्पष्टपणे सांगू शकत नसल्याचे चित्र आहे. 

जगाच्या तुलनेत देशात १२ टक्के कापूस दरवाढ झाली. स्थानिक गरज मोठी आहे. तीच पूर्ण करायची धावपळ कापड मिल, सूतगिरण्या व जिनिंगमध्ये आहे. उत्पादनातील घटीने पूर्ण ताळेबंदच चुकला आहे. कापूस आयातही अनेक वर्षांनंतर देशात वाढणार आहे. कापूस दरवाढ टिकून राहील. 
- अनिल सोमाणी, 
सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

इतर अॅग्रो विशेष
अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधनपुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय...
महिला सक्षमीकरण, शाश्वत शेतीसाठी झटणारी...सातारा जिल्ह्यातील ॲवॉर्ड संस्था शाश्वत शेती...
शेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...
पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्यापुणे : उन्हाचा चटका वाढत असून पाणीटंचाईच्या झळा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः...पुणे : अरबी समुद्र ते दक्षिण महाराष्ट्र या...
‘मांजरी मेडिका’ द्राक्ष ज्यूस वाण...पुणे : मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
‘स्वाभिमानी’ आणि ‘रयत क्रांतीत’ संघर्षसोलापूर : माढा दौऱ्यावर असलेले  कृषी...
सदाभाऊंच्या ताफ्यावर गाजर, तूर, मका...सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या...
लहान वृक्षात संधी महानबोन्सायच्या बहुतांश व्याख्येत छोट्या कुंडीत वृक्ष...
शेतकरी मंडळांची दखल घेणार कोण?आम्ही शेतकरी मागील दहा वर्षांपासून कृषी ...
साखर १०० रुपयांनी उतरलीकोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी साखरेचे वाढलेले दर...
हरभऱ्याच्या किमतीत सुधारणांसाठी सर्व...नवी दिल्ली : हरभऱ्याच्या घसरत्या किमती...
‘चारा छावणी गैरव्यवहारप्रकरणी १४८...सांगली ः दुष्काळी स्थितीत २०१२ ते २०१३ आणि २०१३-...
कापूस गाठींच्या साठ्यासाठी होतोय आटापिटाजळगाव ः गुलाबी बोंड अळीने कापूस उत्पादकांच्या...
प्रश्न हाताळण्याची मुख्यमंत्र्यांची...परभणी : कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्येचे...
अडीच हजार कोटींची एफआरपी थकलीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
कृषी कार्यालयाच्या शिपायाने घातला...बुलडाणा : कृषी खात्यात कार्यरत असलेल्या एका...
पाणी योजनेच्या वीजबिलात आर्थिक मदत...मुंबई  : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा...
बीटी बियाणे दराचा केंद्राकडून पुनर्विचारनागपूर ः बीटी दराबाबत पुनर्विचार करण्याच्या...
बियाणेवाटपाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून...पुणे : ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट...