agriculture news in marathi, Indian cattle Breed research center sanctioned in Baramati | Agrowon

देशी गोवंश संशोधन प्रकल्प बारामतीला होणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे : डेअरी क्षेत्रासाठी देशी गोवंशाबाबत संशोधन प्रकल्प उभारण्यासाठी बारामती केव्हीकेची निवड करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी हा देशातील एकमेव प्रकल्प बारामतीला स्थापन करण्यास मान्यता मिळाल्यामुळे कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे. 

पुणे : डेअरी क्षेत्रासाठी देशी गोवंशाबाबत संशोधन प्रकल्प उभारण्यासाठी बारामती केव्हीकेची निवड करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी हा देशातील एकमेव प्रकल्प बारामतीला स्थापन करण्यास मान्यता मिळाल्यामुळे कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे. 

बारामतीमधील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या या केव्हीकेत विविध उपक्रम राबविले जातात. आता देशी गीर गायी व पंढरपूर म्हशीवर या ठिकाणी संशोधन होणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी मांडली होती. 

गोवंशासाठी अद्ययावत गोठे, खाद्य, प्रजोत्पादन, रोगप्रतिकारकता या विषयावर येथे संशोधन केले जाईल. संशोधनातून हाती येणाऱ्या तंत्राचा प्रसार होण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधा येथे उपलब्ध असेल. या प्रकल्पाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पदाधिकारी व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. 

जगभरातील संशोधनातून देशी गायीचे दूध मानवासाठी उत्तम असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे दूध, शेण, गोमूत्रावर येथे संशोधन होणार असून देशी उत्पादनाचे ब्रॅंडिंग होण्यास मदत मिळेल. ब्राझीलप्रमाणेच उत्तम गायी तयार होण्यासाठीदेखील या प्रकल्पात संशोधन होणार आहे. संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून डॉ. धनंजय भोईटे, समन्वयक म्हणून डॉ. रतन जाधव तर प्रकल्प प्रभारी म्हणून प्रा. नीलेश नलावडे काम बघतील. राज्य शासनाकडून डॉ. शीतल मुकणे या प्रकल्पात सहभागी होत आहेत.        

बारामतीत आता देशी गोवंश व म्हैस सुधार कार्यक्रमासाठी देशातीलच नव्हे; तर भारतीय उपखंडातील पहिला सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी (पशु अनुवंश सुधार) हा प्रकल्प आता सुरू होत आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी नुकतीच मान्यता दिल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. या वेळी केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली उपस्थित होते. या प्रकल्पाचे काम प्रकल्पप्रमुख डॉ. धनंजय भोईटे, समन्वयक डॉ. रतन जाधव, प्रकल्प प्रभारी प्रा. नीलेश नलावडे पाहणार आहेत. शासनाच्या वतीने पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतल मुकणे हे प्रकल्प अंमलबजावणीचे काम पाहणार आहेत.

ब्राझीलसारख्या देशाने भारतातील गीर गायी नेऊन तेथे केलेल्या अधिक संशोधनातून गीर गायीची दुधाची क्षमता वाढवली. आज तेथे याच गायी ६० ते ८० लिटर प्रतिदिन दूध देतात. हे समोर असतानाच जगभरातल्या अनेक संशोधनांनुसार भारतीय देशी गायीचे दूध मनुष्यासाठी उत्तम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे दर्जेदार दूध अधिक प्रमाणात मिळावे व गायी, म्हशींची प्रजननक्षमता, वंशसुधार, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, या हेतूने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पात देशी व संकरीत जनावरांमधील फरक आणि वैशिष्ठ्ये तपासली जाणार आहेत.

या प्रकल्पात देशी गोवंशाबाबत आवश्यक असणारे उत्तम संशोधन, उत्तम तंत्रज्ञान यावर भर दिला जाणार आहे. उत्तम प्रकारचे वळू व विर्याची निर्मिती यामध्ये होणार आहे. संपूर्ण आहार प्रणालीच्या माध्यमातून गायी व म्हशींसाठी आहार व्यवस्थापन व त्यासाठी टीएमआर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संकरीत गायींसाठी उष्ण कटिबंध प्रदेशासाठी असणारा गोठाबांधणी प्रकल्प तयार करणे व देशी गायी-म्हशींसाठी आदर्श गोठा निर्माण करणे, या दोन वेगवेगळ्या बाबी य़ामध्ये समाविष्ट असतील. ब्राझीलप्रमाणे याही देशात उत्तम भारतीय गायी तयार करून दुधाचे उपपदार्थ, गायीच्या शेण-गोमूत्रासाठीही संशोधन केले जाणार आहे.

सेंटर फॉर एक्सलन्स डेअरीची मुख्य उद्दिष्टे

  • पशुसंगोपन प्रात्यक्षिकांचे आयोजन
  • कृत्रिम रेतनासाठी कार्यप्रणालीचा विकास 
  • परिपूर्ण आहार व्यवस्थापन 
  • संकरित गायींसाठी उष्ण कटिबंधासाठी गोठा बांधणी
  • देशी गाय-म्हशीसाठी आदर्श गोठा निर्माण करणे 
  • पशुसंवर्धन व दुग्धविकासासाठी शेतकरी प्रशिक्षण 
  • मोबाईल अॅपमधून संशोधनाची माहिती देणे

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...