agriculture news in marathi, indian cows will benefit farmers says Rupala | Agrowon

देशी गोवंश संगोपनातून कृषी अर्थकारणाला चालना
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे : भारतीय गोवंशाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. गोवंशाचे अंगभूत गुणधर्म, दुधाचे आरोग्यदायी महत्त्व, बदलत्या हवामानातही दुग्धोत्पादन क्षमता, कणखरपणा लक्षात घेता जातिवंत गोवंशाचे संगोपन शेतकऱ्यांनी करावे. शेती, आरोग्य, ऊर्जा आणि प्रक्रिया उद्योगाशी भारतीय गोवंशाची सांगड घातली तर निश्चितपणे आर्थिक फायदा वाढेल. त्यादृष्टीने सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी मांडले.

पुणे : भारतीय गोवंशाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. गोवंशाचे अंगभूत गुणधर्म, दुधाचे आरोग्यदायी महत्त्व, बदलत्या हवामानातही दुग्धोत्पादन क्षमता, कणखरपणा लक्षात घेता जातिवंत गोवंशाचे संगोपन शेतकऱ्यांनी करावे. शेती, आरोग्य, ऊर्जा आणि प्रक्रिया उद्योगाशी भारतीय गोवंशाची सांगड घातली तर निश्चितपणे आर्थिक फायदा वाढेल. त्यादृष्टीने सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी मांडले.

राष्ट्रीय गोसेवा परिषदेचे उद्‍घाटन केंद्रीय राज्यमंत्री रूपाला यांच्या हस्ते शनिवारी (ता. ६) झाले. यावेळी राज्याचे अन्न अाणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, हुकूमचंद सांवला, डॉ. राजेंद्र फडके, मिलिंद मराठे, राजेंद्र लुंकड, महेंद्र देवी उपस्थित होते. गोविज्ञान संशोधन संस्था, जनमित्र सेवा संघ आणि यशोदा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये देशी गाईंचे संगोपन, संवर्धन, पैदास, गोशाळांची उभारणी, प्रक्रिया उद्योगाबाबत चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला राज्य तसेच परराज्यातून देशी गाईंचे संगोपन करणारे पशुपालक उपस्थित आहेत. 

मंत्री रूपाला म्हणाले की, केवळ गाईचा सांभाळ हे उद्दिष्ट न ठेवता जातिवंत दुधाळ गाई आपल्या गोठ्यात कशा तयार होतील यादृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करावा. शेती, आरोग्य, ऊर्जा आणि पूरक व्यवसाय यांची सांगड देशी गाईंच्या संगोपनाशी घातली पाहिजे. गोपालनातून सेंद्रिय खतनिर्मिती, बायोगॅससाठी शेण, गोमुत्राची उपलब्धता होईल. मानवी आरोग्यासाठी देशी गाईचे दूध सर्वोत्तम आहे. केवळ दूध उत्पादनावर न थांबता दुग्धजन्य पदार्थांना शहरी भागात मागणी वाढत आहे. 

पशुपालकांनी स्वतःचा ब्रॅंड तयार करावा. शेण, गोमुत्रापासून विविध उत्पादने तयार होतात, यातून ग्रामीण भागात पूरक व्यवसायाला चांगली संधी आहे. शहरातील नागरिकांकडून देशी गाईचे दूध, तुपाची मागणी लक्षात घेऊन गोशाळांनी गोसंगोपनाबरोबरीने प्रक्रिया उद्योगात उतरावे. गुजरातमध्ये शहराच्या जवळ काही गोशाळांनी ‘काऊ हॉस्टेल` अशी संकल्पना राबवली आहे. या ठिकाणी उत्पादित झालेले दूध शहरातील ग्राहकांपर्यंत पोचविले जाते. पूरक उत्पादनांची निर्मिती केली जाते. या गोसंगोपनामध्ये शहरी लोकांचाही सहभाग वाढला आहे. केंद्र सरकारने गोकूळ मिशनच्या माध्यमातून जातिवंत देशी गाई, वळूंच्या विकासावर भर दिला आहे. याचा पशुपालक आणि गोशाळांनी लाभ घ्यावा.

मंत्री बापट म्हणाले की, आज अनेक पशुपालक देशी गोवंशाचे संगोपन करीत आहेत. त्यांना उत्पादित केलेले दूध, दुग्धजन्य पदार्थांना शहरी बाजारपेठ मिळविण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. यासाठी शहरातील विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जातिवंत दुधाळ गाईंच्या संगोपनासाठी गोशाळा उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावेळी डॉ. फडके, श्री. देवी, श्री. मराठे आणि श्री. सावला यांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन यानिमित्ताने करण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...
साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुककोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे...
हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवसमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे...
अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...