Agriculture News in Marathi, India's growth forecast, International Monetary Fund Report | Agrowon

नोटाबंदी, जीएसटीचा अर्थव्यवस्थेला फटका : आयएमएफ
वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017
वॉशिंग्टन, अमेरिका ः नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीचा फटका अर्थव्यवस्थेला बसला अाहे. चालू वर्षी (२०१७) भारताचा विकासदर ६.७ टक्के राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केला अाहे.
 
हा विकासदर गेल्या एप्रिल अाणि जुलै महिन्यांत जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा ०.५ टक्क्यांनी कमी असेल. तसेच चीनच्या ६.८ टक्के विकासदराच्या तुलनेत भारताचा विकासदर कमी राहणार अाहे, असे अांतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या जागतिक आर्थिक पाहणी अहवालात म्हटले अाहे.
 
वॉशिंग्टन, अमेरिका ः नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीचा फटका अर्थव्यवस्थेला बसला अाहे. चालू वर्षी (२०१७) भारताचा विकासदर ६.७ टक्के राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केला अाहे.
 
हा विकासदर गेल्या एप्रिल अाणि जुलै महिन्यांत जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा ०.५ टक्क्यांनी कमी असेल. तसेच चीनच्या ६.८ टक्के विकासदराच्या तुलनेत भारताचा विकासदर कमी राहणार अाहे, असे अांतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या जागतिक आर्थिक पाहणी अहवालात म्हटले अाहे.
 
अागामी आर्थिक वर्ष २०१८ मध्ये भारताचा विकासदर ७.४ टक्के राहणार असल्याचा अंदाजही ‘आयएमएफ’ने वर्तविला आहे. गेल्या दोन वेळा जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा हा विकासदर ०.३ टक्क्यांनी अधिक असेल, असेही नमूद करण्यात अाले अाहे. भारताचा अार्थिक विकासदर २०१६ मध्ये ७.१ टक्के होता. मात्र, त्यात अाता घसरण झाली अाहे. 
 
नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेचा पाय खोलात जात असल्याचे नमूद केले आहे. १९९९ अाणि २००८ मध्ये भारताचा विकासदर सरासरी ६.९ टक्क्यांपर्यंत वाढला होता. त्यानंतर २००९ मध्ये ८.५ टक्क्यांपर्यंत पोचला. तर २०१० मध्ये तो १०.३ अाणि २०११ मध्ये ६.६ टक्के असा होता. तर २०१२, २०१३ अाणि २०१४ मध्ये विकासदर अनुक्रमे ५.५, ६.४ अाणि ७.५ टक्के असा होता. २०१७ मध्ये तो ६.७ टक्के अाणि २०१८ मध्ये तो ७.४ टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे.
 
जागतिक विकासाला मरगळ
आयएमएफने सादर केलेल्या अहवालात जागतिक विकासाला मरगळ आल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये जागतिक विकासदराचा अंदाज ३.७ टक्के राहणार असून, आगामी वर्षामध्ये तो ३.७ टक्के राहण्याची शक्‍यता ‘आयएमएफ’ने वर्तविली आहे.
.
भारतात सध्या मंदीचे वातावरण आहे. मात्र जागतिक विकासदरात सातत्य आढळून येत आहे. नोटाबंदीचा निर्णय अाणि वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी देशाच्या आर्थिक रचनेवर परिणाम करणारी ठरली आहे.
- मॉरी ऑब्सफेल्ड, आर्थिक सल्लागार व संचालक संशोधक, आयएमएफ

इतर अॅग्रोमनी
नोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...
दुधावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना ‘...देशात दुधाचा पुरवठा वाढला असून केवळ दूध विकणाऱ्या...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...
धान्यांतील पुरवठा वाढ संतुलित होणार?केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या...
सोयाबीन, कापूस, हळदीत घटएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व हळद वगळता...
सोयाबीन, कापूस अन् हळदीत घटएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता...
दुष्काळ, आपत्तीवर चेळकर कुटुंबीयांची...लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील चेळकर...
खतांच्या किमतीत २० टक्के वाढकच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे...
रुपयाची घसरण निर्यातीसाठी लाभदायीसध्या डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमजोर होऊन...
साखर कारखान्यांकडील थकीत रकमेत तीन हजार...केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा...
साखरेच्या दरात ३.५ टक्के वाढकेंद्र सरकारने साखर कारखान्यांना जुलै महिन्यात...
सोयाबीन, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात घटएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता...
सोयाबीनच्या फ्युचर्स भावात घटएनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, मका व साखर...
सोयाबीनच्या फ्युचर्स भावात नरमाईएनसीडिएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, साखर, हळद,...
तूर उत्पादकांना दोन हजार बोनस न दिल्यास...अमरावती ः तुरीची शासकीय हमीभाव खरेदी सुरू करावी...
सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाहीदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर...
सीमाबंदीमुळे टोमॅटोचा लाल चिखलकेंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी...
दूध दर कमी असतानाही मूल्यवर्धित...वाढता उत्पादन खर्च, तुलनेने कमी झालेले दूध दर...
सोयाबीन, मका, हरभऱ्यात नरमाई; साखर, हळद...एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व साखर वगळता...