जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत
बातम्या
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-११चे आज (बुधवार) पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-११चे आज (बुधवार) पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
युरोपियन अवकाश संस्था एरियनस्पेसच्या एरियन-५ रॉकेटच्या साह्याने जीसॅट-११चे प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली. सुमारे पंधरा वर्षांचे आयुष्य असलेल्या जीसॅट-११ उपग्रहाचे वजन पाच हजार ८५४ किलोग्रॅम आहे. हा उपग्रह देशभरात ब्रॉडबॅंड सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. जीसॅट-११ हा इस्रोने निर्मिती केलेला सर्वाधिक वजनाचा उपग्रह आहे. या उपग्रहाचे २५ मे रोजी प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र, काही अतिरिक्त तांत्रिक तपासण्यांसाठी त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. आज अखेर याचे यशस्वी उड्डाण करण्यात आले.
आज पहाटे फ्रेंच गयानातून भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे २.०७ मिनिटे ते ३.२३ मिनिटांच्या दरम्यान अवकाशात पाठविण्यात आला. दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पुरविणारा जीसॅट-११ हा नव्या पिढीतील उपग्रह मानला जातो. एरियना-५ रॉकेटच्या साह्याने जीसॅट-११ आणि कोरियन अवकाश संशोधन संस्थेच्या "जीईओ-केओएमपीएसएटी-२ए' या उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले.
- 1 of 565
- ››