देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकला 

देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकला 
देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकला 

बेळगाव, कर्नाटक ः देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज किल्ला तलावाजवळ आज (ता.12) फडकविण्यात आला. ध्वजाची उंची 110 मीटर असून, देशातील हा सर्वात उंच ध्वज ठरला आहे. एमएसआरसीच्या जवानानी वाद्य वाजवून देशभक्तीपर गीत म्हटले आहे. यानंतर ध्वज फडकविला आणि राष्ट्रगीत म्हटले.  राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी (लिफ्टिंग मशिन्सद्वारे) चालना दिली. एकता आणि अखंडतेचे प्रतिक राष्ट्रध्वज आहे. या स्वरुपाच्या सर्वात उंच ध्वजाची निर्मिती बेळगावात झाली. यामुळे देशाभिमान वाढेल आहे. युवापिढीत देशाप्रती प्रेम निर्माण होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.  आपला एकच देश आणि एकच धर्म. जाती, धर्मभेदच्या भिंती आड आणू नये. आपण सारे भारतीय आहोत. त्याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांनी बाळगायला हवा, असे उद्‌गार आमदार फिरोझसेठ यांनी काढले.  जिल्हाधिकारी झियाउल्ला एस., एमएलआरसी ब्रिगेडियर गोविंद कलवाड, पोलिस आयुक्त डी. सी. राजप्पा, महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, कॅन्टोमेंट सीईओ दिव्या शिवराम, पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, पालिका आयुक्त शशिधर कुरेर, बुडा आयुक्त शकिल अहमद, जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा ऐहोळे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com