देशातील रब्बी पेरणी ५१४ लाख हेक्टरांवर

देशातील रब्बी पेरणी ५१४ लाख हेक्टरांवर
देशातील रब्बी पेरणी ५१४ लाख हेक्टरांवर

नवी दिल्ली : देशभरात शुक्रवारअखेर (ता. १५) रब्बी पेरणी ५१४.२२ लाख हेक्‍टरपर्यंत पोचली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. गतवर्षी या कालावधीत रब्बी पेरणीचे क्षेत्र ५०९.१२ लाख हेक्‍टर होते. लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५ लाख हेक्‍टरने वाढले आहे.

कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भाताची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत भाताची लागवड ९.२५ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा ती १२.८८ लाख हेक्टरवर पोचली आहे. कडधान्यांची लागवड १३८.१९ लाख हेक्‍टरवर झाली असून, गतवर्षी ती १२७.०२ लाख हेक्‍टर होती.

गहू, तेलबिया लागवड कमीच शुक्रवारअखेर गव्हाची लागवड २४५.५० लाख हेक्‍टरवर झाली असून, गतवर्षी या कालावधीत ती २५०.४८ लाख हेक्‍टर होती. तेलबियांची लागवडही गतवर्षीपेक्षा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी तेलबियांची या कालावधीत ७४.४६ लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा ती ७०.७३ लाख हेक्‍टरवर आली आहे. भरडधान्यांची लागवड गतवर्षी ४७.९२ लाख हेक्‍टरवर झाली होती. ती या कालावधीत ४६.९३ लाख हेक्‍टरपर्यंत झाली आहे.

रब्बी पेरणी (लाख हेक्‍टरमध्ये)

पीक २०१६-१७ २०१७-१८
गहू २५०.४८ २४५.५०
भात ९.२५ १२.८८
कडधान्य १२७.०२ १३८.१९
तेलबिया ७४.४६ ७०.७३
भरडधान्य ४७.९२ ४६.९३

(स्रोत : केंद्रीय कृषी मंत्रालय, १५ डिसेंबरपर्यंत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com