agriculture news in Marathi, India's richest 1% corner 73% of wealth generation, Maharashtra | Agrowon

भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के संपत्ती !
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सोयीसुविधांचा लाभ फार थोड्या लोकांपर्यंत पोचतो हे अहवालातून दिसून आले आहे. अहवालातून स्पष्ट झालेली ही बाब चिंताजनक आहे.
- नीशा अग्रवाल, सीईओ (भारत), ऑक्सफम

दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण झालेल्या संपत्तीपैकी तब्बल ७३ टक्के संपत्ती ही देशातील एक टक्का श्रीमंत लोकांनाच प्राप्त झाली आहे. यातून देशातील वाढत्या उत्पन्नातील असमानतेची पातळी ही किती चिंताजनक आहे याचे चित्र स्पष्ट करते, अशी धक्कादायक ‘आॅक्सफॅम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे अाली आहे. 

लोकसंख्येच्या सर्वात गरीब जनतेपैकी ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीत मात्र केवळ १ टक्क्यानीच वाढ झाली आहे. हे सर्वेक्षण जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या वाढत्या आणि सामान्य लोकांच्या उत्पन्नाच्या घटत्या स्थितीला समोर आणणारे ठरले आहे.

जगातील १० देशांमधील ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसा हक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील तयार झालेल्या एकुण संपत्तीपैकी ८२ टक्के वाटा १ टक्का लोकांकडे गेला आहे. तर लोकसंख्येच्या ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झाली नाही.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर अहवाल
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर  हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील सर्व देशांच्या प्रतिनिधींना जागतिक पातळीवरील संपत्ती वाटप आणि लिंग असमानतेची कल्पना यावी आणि या मुद्यांवर फोरममध्ये चर्चा व्हावी, यासाठी हा अहवाल प्रसिद्ध केल्याचे या संस्थेने म्हटले आहे. 

भारताच्या अर्थसंकल्पाएवढी वाढ
गेल्या वर्षी या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालात भारतातील एक टक्का लोकांकडे ५८ टक्के संपत्ती होती. हा आकडा जागतिक पातळीपेक्षा कमी होता. जागतिक ५० टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे होती. तर गेल्या वर्षी २०१७ मध्ये देशातील एक टक्का लोकांच्या संपत्तीत २०.९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती. ही वाढ देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाएवढी आहे, असे आॅक्सफॅमने म्हटले आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...