agriculture news in marathi, Indrayani Gomase pick ten medals with Five gold, PDKV, Akola | Agrowon

अल्प भूधारक शेतकऱ्याच्या मुलीला दहा पदके !
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची
पाच सुवर्णपदके मिळवण्याची असामान्य कामगिरी

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या ३२ व्या दीक्षान्त सोहळ्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव या खेड्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने सर्वाधिक पाच सुवर्ण पदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची
पाच सुवर्णपदके मिळवण्याची असामान्य कामगिरी

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या ३२ व्या दीक्षान्त सोहळ्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव या खेड्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने सर्वाधिक पाच सुवर्ण पदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली. 

बीएसस्सी कृषी पदवी परीक्षेत इंद्रायणी मुरलीधर गोमासे या विद्यार्थिनीने ही नेत्रदीपक कामगिरी केली. इंद्रायणीचे नाव घोषीत होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अादिवासी बहुल तालुका म्हणून संग्रामपूरची अोळख अाहे. या तालुक्यातील तामगाव येथील मुरलीधर गोमासे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने अाई-वडिलांचे नाव झळकवले अाहे. 

इंद्रायणी हिने जळगाव जामोद येथील कृषी महाविद्यालयात बीएसस्सी कृषीची पदवी घेतली. ही पदवी पूर्ण करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विदर्भातील सर्व महाविद्यालयांमधून या पदवी परीक्षेत सर्वाधिक गुणांक प्राप्त केले. तसेच किटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषीविद्या या विषयात सर्वाधिक मूल्यांक मिळवले. या कामगिरीसाठी तिला पाच सुवर्ण, दोन रौप्य, तीन रोख अशी सर्वाधिक दहा पदके मिळाली. 

मुरलीधर गोमासे यांना तीन मुली व एक मुलगा अाहे. इंद्रायणी ही सर्वात मोठी असून तिने कृषी शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी केली. तिच्या या गौरव सोहळ्याला, दीक्षान्त समारंभाला सोमवारी (ता. पाच) तिचे अाईवडील उपस्थित होते. 

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पद्मभूषण तथा नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर, उमेशचंद्र सारंगी, डाॅ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते इंद्रायणीचा गौरव होत असताना तिच्या शेतकरी अाई-वडिलांच्या डोळ्याच्या कडा अानंदाश्रूने पाणावल्या होत्या. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करून तिच्या या यशाला सलाम केला. सोहळ्यानंतरही विविध मान्यवरांनी इंद्रायणीची भेट घेऊन कौतुक केले. 

मुरलीधर गोमासे यांच्याकडे तीन एकर शेती असून पूर्वी बागायती असलेली ही शेती अाता पाण्याअभावी कोरडवाहू झाली. अशाही परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत त्यांनी तीन मुली व मुलाचे शिक्षण सुरू ठेवले अाहे. एक मुलगी कृषी पदवीधर, दुसरी इंजिनिअर तर मुलगाही इंजिनिअर होत अाहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...