agriculture news in marathi, Industrialist double the income in a year | Agrowon

उद्योगपतींच्या संपत्तीत वर्षात दुपटीने वाढ
वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. त्यादृष्टीने भरीव काहीही झालेले नसताना, दुसरीकडे देशातील उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे चित्र पुढे आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच वर्षात (२०१७ मध्ये) दुपटीहून अधिक (१२५ टक्के) वाढ झाली आहे.  

पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. त्यादृष्टीने भरीव काहीही झालेले नसताना, दुसरीकडे देशातील उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे चित्र पुढे आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच वर्षात (२०१७ मध्ये) दुपटीहून अधिक (१२५ टक्के) वाढ झाली आहे.  

एका व्यवसायविषयक वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार अदानी ग्रुपचे संस्थापक असलेले गौतम अदानी यांची जानेवारी २०१७  मध्ये ४.६३ अब्ज डॉलर संपत्ती होती. ती डिसेंबर २०१७ अखेर १०.४ अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये वर्षभरात १२४.६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. डी-मार्टचे मालक राधाकृष्णन दमाणी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्च २०१७ मध्ये ३.८८ अब्ज डॉलर असलेली त्यांची संपत्ती डिसेंबर २०१७ अखेर ६.९६ अब्ज डॉलरवर पोचली आहे. 

मुकेश अंबानी यांची जानेवारी २०१७ मध्ये २२.७० अब्ज डॉलर इतकी संपत्ती होती. त्यामध्ये ७७.५३ टक्‍क्‍यांनी वाढ होऊन डिसेंबर २०१७ अखेर ती ४०.३० अब्ज डॉलरपर्यंत पोचली. याचबरोबर मुकेश अंबानी हे जागतिक श्रीमंतांच्या यादीत २०व्या क्रमांकावर आले आहेत. पालनजी मेस्त्री, सायरस पूनावाला आणि शिव नाडर यांच्या संपत्तीमध्येही अनुक्रमे २७.०१, १६.५० आणि १५.८३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 
 

भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीमधील वाढ (टक्‍क्‍यांमध्ये)

गौतम अदाणी १२४.६
राधाकृष्णन दमाणी ८०
मुकेश अंबानी ७७.५३
कुमार बिर्ला ५०.४१
अझीम प्रेमजी ४६.७२
उदय कोटक ४४.८७
विक्रम लाल ४४.०३
लक्ष्मी मित्तल ३६.११
(आलेख : अप्रमाणित, कालावधी : जानेवारी ते डिसेंबर २०१७ ) 

जागतिक पातळीवरील उद्योजकांची सांपत्तिक स्थिती

नाव जानेवारी २०१७ डिसेंबर २०१७  टक्के 
जेफ बेझोस  ६५ ९९ ५२ 
बिल गेटस ८१.९६ ९१.८ १२
वॉरन बफे ७२.९१ ८५.३ १७
(संपत्ती : अब्ज डॉलरमध्ये) 

----
जागतिक पातळीवरील उद्योजकांची सांपत्तिक स्थिती
नाव--- जानेवारी 2017 --- डिसेंबर 2017 --- टक्के
जेफ बेझोस--- 65--- 99--- 52
बिल गेटस--- ...--- 91.8--- 12
वॉरन बफे--- ...--- 1785.3--- 17
(संपत्ती : अब्ज डॉलरमध्ये)

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...