Agriculture News in Marathi, influence of Cyclone Ockhi, Rains hit Lakshadweep islands, damage houses, India | Agrowon

ओखी चक्रीवादळाचा हाहाकार कायम
वृत्तसेवा
रविवार, 3 डिसेंबर 2017

चेन्नई, तिरुवनंतपूरम ः ओखी चक्रीवादळ शनिवारी (ता. २) लक्षद्वीपला धडकले. या चक्रीवादळामुळे केरळ अाणि तमिळनाडूतील मृतांचा अाकडा १६ वर पोचला अाहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढल्याने दक्षिण भारतातील किनारी भागात दक्षतेचा इशारा देण्यात अाला अाहे.

चेन्नई, तिरुवनंतपूरम ः ओखी चक्रीवादळ शनिवारी (ता. २) लक्षद्वीपला धडकले. या चक्रीवादळामुळे केरळ अाणि तमिळनाडूतील मृतांचा अाकडा १६ वर पोचला अाहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढल्याने दक्षिण भारतातील किनारी भागात दक्षतेचा इशारा देण्यात अाला अाहे.

सध्या हे चक्रीवादळ लक्षद्वीप अाणि अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागात घोंघावत अाहे. पुढील चोवीस तासांत या वादळाची तीव्रता वाढणार असून, ते पश्चिम- वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता अाहे. या चक्रीवादळाची तीव्रता पुढील ४८ तास कायम राहील. यामुळे ताशी १५०-१६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला अाहे.

या चक्रीवादळामुळे पुढील चोवीस तासांत लक्षद्वीपच्या उत्तरेकडील काही भागांत मुसळधार, तर काही भागात अतिवृष्टी (२० सेंटिमीटरपर्यंत) होणार असल्याचा इशारा देण्यात अाला अाहे. केरळमधील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता अाहे. पुढील चोवीस तासांत केरळ तसेच कर्नाटक हद्दीतील समुद्र खवळण्याची शक्यता अाहे.

या चक्रीवादळामुळे पडझड होऊन नुकसान होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात अाली अाहे. लक्षद्वीप, केरळ अाणि कर्नाटकमधील मच्छीमारांनी पुढील ४८ तासांत समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली अाहे.

२१८ मच्छीमारांना वाचविले
ओखी चक्रावादळाच्या प्रभावामुळे केरळ, लक्षद्वीप किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडत अाहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहत असून, मोठ्या प्रमाणात पडझड झाली अाहे. नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली अाहेत. तसेच संपर्क सेवा ठप्प झाली अाहे.

जोरदार पावसामुळे पाणीपातळी वाढल्याने लक्षद्वीपमधील कलपेनी बेट भागातील पाच बोटींचे नुकसान झाले. दरम्यान, समुद्रात अडकून पडलेल्या २१८ मच्छीमारांना नौदल, हवाई दल अाणि तटरक्षक दलाच्या जवानांच्या मदतीने सुरक्षित किनाऱ्यावर अाणण्यात अाले अाहे.

पंतप्रधानांनी तमिळनाडूला दिले मदतीचे अाश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्याशी फोनवरून चक्रीवादळाने नुकसान झालेल्या स्थितीची माहिती घेतली अाहे. तमिळनाडूला सर्वोत्तोपरी मदतीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. तिरुनेलवेली या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. करुपंथुराई-मेलापल्याम या लिंकरोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...