agriculture news in marathi, Information about the bond by the Agriculture Director | Agrowon

बोंडसडविषयी कृषी सहसंचालकांनी घेतली माहिती
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

नागपूर ः कापसावर बोंड अळीचे प्रमाण अवघे ५ ते दहा टक्‍के इतकेच असून बुरशीजन्य रोगामुळे बोंड सडण्याचे प्रमाण मात्र वाढीस लागले आहे. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविण्यात याव्यात, अशी मागणी अमृत देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केली आहे. त्याची दखल घेत बुटीबोरी परिसरात कृषी अधिकाऱ्यांकडून प्रादुर्भावग्रस्त पिकाची पाहणी करण्यात आली.

नागपूर ः कापसावर बोंड अळीचे प्रमाण अवघे ५ ते दहा टक्‍के इतकेच असून बुरशीजन्य रोगामुळे बोंड सडण्याचे प्रमाण मात्र वाढीस लागले आहे. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविण्यात याव्यात, अशी मागणी अमृत देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केली आहे. त्याची दखल घेत बुटीबोरी परिसरात कृषी अधिकाऱ्यांकडून प्रादुर्भावग्रस्त पिकाची पाहणी करण्यात आली.

अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव या वर्षीच्या हंगामात कमी असल्याचा दावा केला आहे. त्याऐवजी या वर्षी हंगामाच्या सुरवातीला बुरशीसदृश रोगामुळे बोंड सडण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रादुर्भावग्रस्त बोंडाचे त्या पार्श्‍वभूमीवर पृथ्थकरण करण्याकरीता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे देण्यात आली. त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागालादेखील अशी बोंड सोपविण्यात आली. नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांचीदेखील शेतकऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांनी प्रादुर्भावग्रस्त शेतीच्या पाहणीचा आग्रह धरला. त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, अर्चना कडू यांनी बुटीबोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट दिली. यावेळी बोंड सडत असल्याचे रवींद्र भोसले यांच्या निदर्शनास आले.

तज्ज्ञांना केले तत्काळ पाचारण
शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे बोंड सडत असल्याचे लक्षात आल्यानंतर रवींद्र भोसले यांनी केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना मोबाईलवरून संपर्क साधत त्यांना बुटीबोरी परिसरात येण्यास सांगितले. त्यानुसार तज्ज्ञ फिल्डवर पोचले. या वेळी नमुने घेऊन अहवाल देण्याच्या सूचना
रवींद्र भोसले यांनी तज्ज्ञांना केल्या.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...