agriculture news in marathi, insecticide production, Japan, crop care fedretion | Agrowon

कीटकनाशक उत्पादनात आता जपानची मदत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

नागपूर : देशात अनेक प्रकारची प्रभावी कीटकनाशके तसेच त्याकरीता लागणारी रसायने आयात करावी लागतात. परंतु लवकरच जपानच्या मदतीने भारतातच हे काम होणार असून त्याकरीता १०० कोटी रुपयांची तदतूद पहिल्या टप्प्यात करण्यात आल्याची माहिती क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष तसेच इन्सेक्‍टीसाइडस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अगरवाल यांनी दिली.

नागपूर : देशात अनेक प्रकारची प्रभावी कीटकनाशके तसेच त्याकरीता लागणारी रसायने आयात करावी लागतात. परंतु लवकरच जपानच्या मदतीने भारतातच हे काम होणार असून त्याकरीता १०० कोटी रुपयांची तदतूद पहिल्या टप्प्यात करण्यात आल्याची माहिती क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष तसेच इन्सेक्‍टीसाइडस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अगरवाल यांनी दिली.

देशांतर्गत कीटकनाशकाचा व्यवसाय ३५ हजार कोटी रुपयांचा आहे. त्यामध्ये १७ हजार कोटी रुपयांच्या निर्यात व्यवसायाचा तर तितक्‍याच देशाअंतर्गंत व्यवसायाचा समावेश असल्याचे राजेश अगरवाल यांनी सांगीतले. देशात कीटकनाशकांच्या फॉम्युर्लेशनसाठी काही रसायने आयात करावी लागतात. या कारणामुळे कीटकनाशकांच्या किमती वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या रसायनांचे फॉम्युर्लेशन भारतातच व्हावे याकरीता प्रयत्न केला जात आहे. त्याकरीता जपानचे सहकार्य घेतले जात असून, सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद याकरीता करण्यात आली आहे.

‘तो‘ आरोप चुकीचा
देशात कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा आरोप काही स्वयंसेवी करतात. परंतु अशा संस्थांना या कामासाठी विदेशी निधी कसा आणि कोणत्या निकषावर मिळतो याची पडताळणी होण्याची गरज त्यांनी मांडली. त्यासोबतच देशात कीटकनाशकांचा वापर वाढला, असे म्हणणेदेखील संयुक्तिक नाही, कारण आपल्यापेक्षा चीनमध्ये कीटकनाशकांचा वापर जास्त होतो. पिकाच्या संरक्षणाकरीता अशा उपाययोजना गरजेच्या ठरतात. हरितक्रांतीमध्ये पीक संरक्षकांचादेखील आपला वाटा आहेच.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...