वऱ्हाडात विषबाधेने आठ जण मृत्युमुखी
गोपाल हागे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सप्टेंबर महिन्यात ९७ विषबाधित रुग्ण ‘सर्वोपचार’मध्ये दाखल झाले होते. यातील १०४ रुग्ण हे अकाेला जिल्ह्यातील होते. भरती असलेल्यांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला. 
 

अकोला ः यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीत विषबाधेने शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला अाहे. वऱ्हाडातही या हंगामात गेल्या चार महिन्यांत शंभरावर शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे समोर अाले. यात गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ९७ जणांना विषबाधा झाली होती. यापैकी आठ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर अाली अाहे. येथील रुग्णालयाच्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे. 

चालू खरीप हंगामात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रकार जून महिन्यापासूनच सुरू झालेे. अकोला येथे मध्यवर्ती रुग्णालय असून, येथे अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती अशा विविध जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात.

जून महिन्यात या ‘सर्वोपचार’ रुग्णालयात फक्त दोन विषबाधित रुग्ण दाखल झाले होते. सप्टेंबरअखेरपर्यंत हा अाकडा १३० पर्यंत पोचला. जुलै महिन्यात पाच रुग्ण, आॅगस्टमध्ये २६, तर सप्टेंबर महिन्यात ९७ विषबाधित रुग्ण ‘सर्वोपचार’मध्ये दाखल झाले होते. यातील १०४ रुग्ण हे अकाेला जिल्ह्यातील होते. भरती असलेल्यांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या पिकांवर रोग, किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पिकांवरील रोग, कीटक, किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध कंपन्यांच्या कीटकनाशकांच्या फवारणीला प्राधान्य देतात. 

१२२ जणांना वाचविण्यात यश
फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांमध्ये १०४ रुग्ण हे अकोला जिल्ह्यातील, १७ बुलडाणा जिल्ह्यातील, तर प्रत्येकी ४ रुग्ण अमरावती व वाशिम जिल्ह्यातील होते. यवतमाळमधील एका रुग्णासही या कालावधीत ‘सर्वोपचार’मध्ये दाखल करण्यात आले होते. या १३० रुग्णांपैकी ८ रुग्ण दगावले; मात्र १२२ रुग्णांना वाचविण्यात यश आल्याची माहितीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दुजोरा दिला. 

इतर अॅग्रो विशेष
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न...आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक...
एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथआजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...
बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी...पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली...
महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल...बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...