agriculture news in marathi, inspection challenge of pink bollworn affected crop, akola, maharashtra | Agrowon

अकोल्यात बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आव्हान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

अकोला : या हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून या पिकाचे पंचनामे केले जात अाहेत. अातापर्यंत सुमारे ५५ टक्क्यांवर काम पूर्ण झाले. उर्वरित क्षेत्राचे पंचनामे दोन दिवसांत म्हणजेच आजपर्यंत (बुधवारी, ता. २०) पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले अाहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेत याबाबत सूचना केली अाहे. मात्र अद्याप ४५ टक्के क्षेत्राचे पंचनामे व्हायचे शिल्लक असून ते दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हानच आहे, अशी चर्चा यंत्रणांमध्ये सुरू झाली अाहे.

अकोला : या हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून या पिकाचे पंचनामे केले जात अाहेत. अातापर्यंत सुमारे ५५ टक्क्यांवर काम पूर्ण झाले. उर्वरित क्षेत्राचे पंचनामे दोन दिवसांत म्हणजेच आजपर्यंत (बुधवारी, ता. २०) पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले अाहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेत याबाबत सूचना केली अाहे. मात्र अद्याप ४५ टक्के क्षेत्राचे पंचनामे व्हायचे शिल्लक असून ते दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हानच आहे, अशी चर्चा यंत्रणांमध्ये सुरू झाली अाहे.

जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पीक उद्‍ध्वस्त झाले. या पिकाचे पंचनामे तयार करण्याबाबत शासनाने सूचना केली असून भरपाई मिळण्याची शक्यता वर्तविली जात अाहे. तसे संकेत महसूल विभागामार्फत देण्यात आले अाहेत. त्यामुळेच बोंडअळीग्रस्त कपाशी क्षेत्राचा तातडीने संयुक्त सर्व्हे करून पंचनामे केले जात अाहेत. तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यासोबतच संबंधित गावचे सरपंच, पोलिस पाटील या पाच जणांच्या उपस्थितीत हे काम केले जात अाहे.
 
या सर्वेक्षणाचा अहवाल तातडीने सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (ता. ८) घेतलेल्या बैठकीत तहसीलदारांना सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोट, बार्शिटाकळी, पातूर, बाळापूर या सात तालुक्यांत पंचनामे सुरू आहेत. सध्या हे काम केवळ ५५ ते ५६ टक्के पूर्ण झाले अाहे.
 
अद्याप सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत यंत्रणा पोचू शकलेली नाही. कामाची गती संथ अाहे, या मुद्द्यावर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अाता कुठल्याही परिस्थितीत पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश त्यांनी १३ डिसेंबरला घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला होता.
 
अाता पुन्हा सोमवारी झालेल्या बैठकीत या कामाचा अाढावा घेतला व तातडीने कार्यवाही करण्याबाबत सांगतिले. सध्या जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ८४.२८ टक्के तर पातूर, बार्शीटाकळी या दोन तालुक्यांत ६० टक्क्यांवर सर्वेक्षण झाले अाहे. 

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...