agriculture news in marathi, Inspection from Panchayatraj Committee | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पंचायतराज समितीकडून झाडाझडती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सोलापूर : सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायतराज समितीने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात झाडाझडती सुरू केली असून, जिल्ह्यातील विविध भागांत समितीच्या चार सदस्यांची विविध पथके तयार करून झाडाझडती घेतली जात आहे, याच तपासणीच्या अनुषंगाने कुरुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाच्या तक्रारीतून दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश या सदस्यांनी दिले आहेत. त्याशिवाय कुर्डुवाडी, माढा, करमाळ्यातील काही कामांबाबतही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायतराज समितीने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात झाडाझडती सुरू केली असून, जिल्ह्यातील विविध भागांत समितीच्या चार सदस्यांची विविध पथके तयार करून झाडाझडती घेतली जात आहे, याच तपासणीच्या अनुषंगाने कुरुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाच्या तक्रारीतून दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश या सदस्यांनी दिले आहेत. त्याशिवाय कुर्डुवाडी, माढा, करमाळ्यातील काही कामांबाबतही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुरुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या कामाबाबत तक्रारी आल्याने त्याची पाहणी करण्यात आली. या वेळी समितीतील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना अधिकाऱ्यांना उत्तरे देता येत नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व मोहोळचे उपअभियंता यांच्या निलंबनाचे आदेश पंचायतराज समितीच्या सदस्यांनी दिले. कुरुल येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चून अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी वसाहत उभी केली. मात्र, या आरोग्य केंद्र व कर्मचारी वसाहतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी येथील कार्यकर्त्यांनी केल्या.

पंचायतराज समितीने अचानक भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दरवाजे फायबरचे आहेत, पाण्याची सोय नाही, लाइट फिटिंग अपूर्ण आहे, पेव्हर ब्लॉकचे काम निकृष्ट झाल्याचे या वेळी समितीच्या निदर्शनास आले. आरोग्य केंद्राच्या बांधकामाबाबत चौकशी केली असता, स्लॅबला प्लॅस्टर नसल्याचे दिसून आले. तसेच दरवाजे, खिडक्‍या, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने निकृष्ट दर्जाचे दिसून आले. परिणामी समितीमधील आमदार वीरेंद्र जगताप, किरण वाघमारे, सतीश चव्हाण, राहुल मोटे आदींनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

माढा, कुर्डुवाडी, करमाळ्यातील रस्त्यांबाबतही समिती सदस्यांकडे तक्रारी आल्या, त्याच्या पाहणीवेळीही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. उत्तर सोलापुरातील तिऱ्हे येथील आरोग्य केंद्र, दक्षिण सोलापुरातील लिंबीचिंचोळीची प्राथमिक शाळा, या ठिकाणी सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. पंढरपूर, अक्कलकोटमध्ये समितीच्या बैठका झाल्या. त्यात विविध कामांचा आढावा घेण्यात आला. कामचुकार आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे या वेळी सदस्यांनी ठणकावून सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...