agriculture news in marathi, inspection of pink bollworn affected crop, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील बोंड अळीग्रस्त पिकाचे कृषी विभागाने केले पंचनामे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017
कापसावरील बोंड अळीबाधित क्षेत्राची पाहणी केली असून, त्याचे पंचनामेही झाले आहेत. लवकरच कृषी आयुक्त कार्यालयाकडे याबाबतची माहिती पाठविली जाणार आहे.
- मनोज वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी, मिरज.
सांगली (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. त्यामुळे नुकसान झालेल्या कापसाचे पंचनामे कृषी विभागाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याबाबतचे वृत्त बुधवारी (ता.२०) ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांचे कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. पंचनाम्याचे प्रस्ताव तयार करून ते कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी दिली.
 
जिल्ह्यात मिरज तालुकाच्या पूर्व भाग व आटपाडी तालुक्‍यातील कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागातील कापसाचे एकूण क्षेत्र किती, कापसाचे किती टक्के नुकसान झाले आहे, याबाबतची माहिती घेतली आहे. मिरज पूर्व भागात सुमारे १२ हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड असून याचे पंचनामे झाले आहेत. पंचनाम्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेही सादर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी हे प्रस्ताव शासनाकडे देणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...