agriculture news in Marathi, Inspector of the City District Magistrate's Investigation Team was exposed | Agrowon

नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची छावणी चालकांत धास्ती
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र, त्यात सरकारी नियमाप्रमाणे सुविधा दिल्या जातात की नाही हे पाहण्यासाठी नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी छावणी तपासणी मोहिमच सुरू केली आहे. कसलीही कल्पना न देता जिल्हाधिकारी अचानक येत असल्याने चालकही धास्तावले आहेत. 

नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र, त्यात सरकारी नियमाप्रमाणे सुविधा दिल्या जातात की नाही हे पाहण्यासाठी नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी छावणी तपासणी मोहिमच सुरू केली आहे. कसलीही कल्पना न देता जिल्हाधिकारी अचानक येत असल्याने चालकही धास्तावले आहेत. 

चाऱ्याचे प्रमाण, पाणी, जनावरांची वैद्यकीय तपासणी, हिरवा चारा, आठवड्यातून तीन दिवस पशुखाद्य, छावणीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेसा उजेड असावा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी छावणी चालकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. नगर जिल्ह्यामध्ये या आधी काही वर्षांपूर्वी छावण्या चालवताना गैरव्यवहार झाल्‍याचे उघड झाले होते. त्यामुळे यंदा विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र, छावणीतून ‘लाभ’ मिळण्याची आशा ठेवलेल्यांनी तपासणी मोहिमेची धास्ती घेतली आहे. 

नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांत यंदा दुष्काळी स्थिती आहे. शेतीची अवस्था तर वाईट आहेच. पण जनावरे जगवण्याची प्रत्येक शेतकऱ्यांसमोर चिंता आहे. सरकारने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यामध्येही शनिवारपर्यंत २२६ छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यांपैकी १५८ छावण्या सुरू झाल्या असून, त्यांत लहान-मोठी ८४ हजार जनावरे दाखल झालेली आहेत. या जनावरांवर सरकारला रोज ५४ लाख ५७ हजार ६२० रुपये खर्च करत आहेत. मात्र, अजूनही अनेक गावांना छावण्याची प्रतीक्षा आहेत. 

नगर जिल्ह्याने याआधीही दुष्काळाच्या झळा सोसलेल्या आहेत. त्या वेळी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या. मात्र, त्या वेळी जनावरे जगवण्यासोबत छावण्या चालक, कार्यकर्तेच मालामाल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाच्या गंभीर झळा सोसलेल्या असल्या तरी छावण्याचालकांना मात्र अच्छे दिन आले होते. जनमाणसात त्या वेळी छावणीचालकांना झालेल्या लाभाचीही जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर झालेल्या छावण्यातील गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून झालेल्या चौकशीत चारशेपेक्षा जास्ती छावण्याचालक संस्थांचा गैरव्यवहार उघड झाला होता. त्यांच्यावर फारशी गांभिर्याने कारवाई केलेली नसली तरी या वेळी मात्र त्या संस्थांना छावण्या सुरू करण्याला मान्यता दिलेली नाही.

पशुधन वाचविण्यासाठी छावण्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, सुविधेबाबत चालकांकडून कुचराई होताना आढळली, तर कारवाई अटळ राहील. सरकारने सांगितलेल्या सुविधा तातडीने पुरविण्याची व्यवस्था चालकांनी करावी. छावणीत पुरेसा प्रकाश ठेवण्याची व्यवस्था तातडीने व्हावी. प्रत्येक छावणीत सीसीटीव्ही कॅमेरेही बसवावेत.- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, नगर

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...