त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
अकोला : नाफेडमार्फत सुरू असलेली मूग, उडीद खरेदीची मुदत बुधवारी (ता.१३) संपुष्टात अाली. त्यामुळे शेतमाल विक्री न झालेले शेतकरी चिंतातूर झाले अाहेत. याबाबत ‘ॲग्रोवन’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर नाफेडने सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुदतीच्या अात नोंदणी केलेली असलेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी करण्याबाबत निर्देश दिले अाहेत.

या हंगामात केंद्र शासनाच्या हमीभावानुसार मूग, उडदाच्या खरेदीसाठी नाफेडने प्रत्येक जिल्ह्यात व तालुकास्तरावर केंद्र उघडले होते. त्याद्वारे खरेदी सुरू करण्यात अाली. सुरवातीच्या काळात अार्द्रतेचा मुद्दा कळीचा बनला होता. हळूहळू ही परिस्थिती बदलून खरेदीने वेग घेतला. नंतरच्या काळात खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागेचा मुद्दा गाजत होता. याचदरम्यान मुदत संपल्याने बुधवारी (ता.१३) सायंकाळपासून नाफेडची खरेदी थांबवण्यात अाली. परंतु ही खरेदी बंद करताना असंख्य केंद्रांवर नोंदणी केलेला शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे शिल्लक असल्याचे समोर अाले होते.
नोंदणी झालेला शेतमाल खरेदी करून मूग, उडदाचे मोजमाप पूर्ण करण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले अाहेत. त्यानुसार जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी स्थानिकांना सूचना करीत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याबाबत कळविले. त्यानुसार नोंदणी झालेली खरेदी सुरू करण्यात अाली असल्याचे नाफेडच्या सूत्राने सांगितले.
एक महिना मुदत वाढवण्याची मागणी
१३ डिसेंबरला मुदत संपल्याने नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा मूग, उडीद हा शेतमाल खरेदी करणे बंद करण्यात अाले. राज्यात अद्यापही असंख्य शेतकऱ्यांकडे शेतमाल शिल्लक असून तो हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे एक महिन्याची मुदत वाढवून मागितली अाहे. ही मुदत वाढवून मिळाल्यास अाणखी एक महिना नाफेडतर्फे खरेदी होऊ शकणार अाहे. यासाठी केंद्राची परवानगी महत्त्वाची अाहे.
- 1 of 347
- ››