agriculture news in marathi, Instructions for withdrawing Vanhak claim within three months | Agrowon

वनहक्क दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

नाशिक  : आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईला मार्च महिन्यात काढण्यात आलेल्या लाँग १०० दिवसांहून अधिक दिवस उलटल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी वनहक्क दावे व अपील संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात तीन महिन्यांच्या आत हे दावे निकाली काढण्याचे निर्देश दिले.

नाशिक  : आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईला मार्च महिन्यात काढण्यात आलेल्या लाँग १०० दिवसांहून अधिक दिवस उलटल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी वनहक्क दावे व अपील संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात तीन महिन्यांच्या आत हे दावे निकाली काढण्याचे निर्देश दिले.

प्रलंबित दावे निकाली निघावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम, २००६ व नियम २००८ उपविभागस्तरीय समिती सदस्य व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची वनमित्र मोहीम व प्रशिक्षण कार्यशाळा झाली. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी हे निर्देश दिले.

नाशिकहून मार्च महिन्यात हा लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यावेळेस आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे वनहक्क जमीन दावे हा प्रमुख विषय होता. सरकारने या मोर्चाबरोबर चर्चा केल्यानंतर वनहक्काचे सर्व प्रलंबित दावे, अपील यांचा सहा महिन्यांत जलदगतीने निपटारा करण्यात येईल. प्रत्यक्ष ताब्यापैकी कमी क्षेत्र दिले गेले आहे. त्या अनुषंगाने मोजणी करून पात्र ठरणाऱ्यांना कमाल चार हेक्टर क्षेत्र देण्यात येईल, असे आश्वासन दिले. पण, त्यानंतर जिल्हा पातळीवर या दाव्याचे तीन महिने उलटूनही संथगतीने काम सुरू होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेत अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, सहायक जिल्हाधिकारी अमन मित्तल, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील प्रशिक्षक राकेश पाटील, कविता गायकवाड, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहायक वनसरंक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.

कालबद्ध मुदतीची अट
या वेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन म्हणाले, की अपिलांच्या कालबद्ध सुनावणीसाठी वनमित्र मोहीम शासनातर्फे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून वनहक्क दावे निकाली काढण्याबाबत येणाऱ्या समस्यांवर चर्चा करावी. सकारात्मक दृष्टीकोनातून दावे व अपिले कालबद्ध मुदतीत निकाली काढून वनमित्र मोहीम यशस्वी करावी. उपविभागीयस्तरीय व वनहक्क समितीने प्रकरणे निकाली काढताना त्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. वनविभागाने पीओआर रिपोर्टचा आधार न घेता इतर विभागाच्या पुरव्यांचाही विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...