agriculture news in marathi, Insufficient funds for micro irrigation in Jalgaon | Agrowon

जळगावमध्ये सूक्ष्म सिंचनासाठी अपुरा निधी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

जळगाव : कृषी विभागातर्फे सूक्ष्मसिंचनाकरिता देण्यात येणाऱ्या अनुदान वितरणासाठी निधी कमी पडत असून, अजून निम्म्या निधीचे वितरणही झालेले नाही.  मागील वर्षाचा तीन कोटी ६८ लाख निधी यंदाच्या निधीमधून द्यावा लागल्याने राज्य शासनाचा निधीही अपुरा पडत आहे.

केंद्र व राज्य शासन यांच्या सहकार्याने सूक्ष्मसिंचन अनुदान योजना राबविली जात आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सुमारे २४ हजार अर्ज या योजनेच्या लाभासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाले.

जळगाव : कृषी विभागातर्फे सूक्ष्मसिंचनाकरिता देण्यात येणाऱ्या अनुदान वितरणासाठी निधी कमी पडत असून, अजून निम्म्या निधीचे वितरणही झालेले नाही.  मागील वर्षाचा तीन कोटी ६८ लाख निधी यंदाच्या निधीमधून द्यावा लागल्याने राज्य शासनाचा निधीही अपुरा पडत आहे.

केंद्र व राज्य शासन यांच्या सहकार्याने सूक्ष्मसिंचन अनुदान योजना राबविली जात आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सुमारे २४ हजार अर्ज या योजनेच्या लाभासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाले.

या योजनेसंबंधी राज्य शासनाकडून १८ कोटी निधी येणे अपेक्षित होते. परंतु, शासनाने फक्त १५ कोटी निधी दिला. त्याचे वितरण सुरू करताना प्रथम मागील वर्षाचे थकीत अनुदानही द्यावे लागले. मागील वर्षाचे तीन कोटी ६८ लाख रुपये अनुदान थकीत होते, त्याचे वितरण केले. नंतर या वर्षासाठी आलेल्या प्रस्तावांसाठी निधी वितरण सुरू झाले. या वर्षाच्या प्रस्तावांसाठी निधी मात्र अपूर्ण पडणार आहे.
३६ कोटींवर निधी हवा

यंदा ३६ कोटी रुपयांची गरज सूक्ष्मसिंचन अनुदानाच्या प्रस्तावांसाठी लागणार आहे. मार्चअखेरपर्यंत त्यासंबंधीची कार्यवाही करावी लागेल. यात जेवढा निधी राज्य शासन देईल, तेवढाच केंद्राकडून मिळेल. अर्थातच आजघडीला उपलब्ध निधी लक्षात घेता २३ कोटी रुपयांचे प्रस्ताव मार्गी लावता येईल. १० कोटींचे प्रस्ताव मार्गी लावणे शक्‍य होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुबार अर्जांचा शोध
सूक्ष्मसिंचन अनुदानाचे प्रस्ताव ऑनलाइन मागविले होते. काही शेतकऱ्यांकडून दोन-तीनदा अर्ज दाखल झाले आहेत. अशा दुबार अर्जांचा शोध कृषी विभागाने सुरू केला आहे. हे अर्ज शोधल्यानंतर अर्जांची संख्या कमी होईल आणि आपसूकच अनुदानाची रक्कम आणखी कमी होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

दुबार अर्ज असल्याची शंका कृषी विभागाला असून, त्यासंबंधी माहिती घेतली जात आहे. असे अर्ज नाकारले जातील. यामुळे अनुदानाचा बोजा आपसूकच कमी होईल.
- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव.

 

इतर बातम्या
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...