‘आषाढी'साठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचा विमा

‘आषाढी'साठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचा विमा
‘आषाढी'साठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचा विमा

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या जीविताची काळजी म्हणून मंदिर समितीने वारकऱ्यांचा विमा उतरविला आहे. वारकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली, तर जखमी वारकऱ्यास एक लाख (मर्यादा : किरकोळ जखमी, गंभीर जखमी), मृत्युमुखी पडणाऱ्या वारकऱ्यास (मर्यादा) दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तीन दिवसांच्या कालावधीसाठी ही सुरक्षा असेल. मंदिर समितीने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे तीन लाख ५४ हजार रुपयांचा प्रीमियम त्यासाठी भरला आहे.

पंढरपूर शहर, ६५ एकर, वाखरी पालखी तळ या ठिकाणापर्यंत दुर्घटनेतील वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशी अशा तीन दिवसांचा कालावधी त्यासाठी निश्‍चित करण्यात आला आहे. या वारीदरम्यान १०० वारकरी आपत्तिग्रस्त गृहीत धरून प्रशासनाने विमा हप्त्यापोटी प्रीमियम भरला आहे.

पंढरपुरात वर्षातील प्रमुख चार वाऱ्यांपैकी एक असणारी आषाढी वारी ही अत्यंत महत्त्वाची गणली जाते. या वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यातच २०१५ कालावधी मध्ये आषाढी यात्रेत चेंगराचेंगरी व चंद्रभागा नदीमध्ये बुडून तीन भाविकांचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभीर्य पाहून २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकऱ्यांचा विमा उतरविला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com