नांदेड जिल्ह्यात ५ लाख हेक्टर पिकांना विमा कवच

नांदेड जिल्ह्यात ५ लाख हेक्टर पिकांना विमा कवच
नांदेड जिल्ह्यात ५ लाख हेक्टर पिकांना विमा कवच

नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेतर्गंत यंदाच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १० लाख ९१ हजार २८४ पीकविमा प्रस्ताव दाखल केले असून, ४८ कोटी २२ लाख रुपये विमा हप्त्याचा भरणा केला केला आहे. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या एकूण क्षेत्रापैकी ५ लाख ७७ हजार ९५ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. तब्बल १ लाख ८८ हजार ७९ हेक्टर वरील पिके विमा संरक्षित करण्यात आली नसल्यामुळे जोखीम वाढली.

यंदा जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी मिळून एकूण १० लाख ९१ हजार २८४ विमा प्रस्ताव सादर केले. मुखेड तालुक्यातून सर्वाधिक १ लाख ६२ हजार ८७९ तर अर्धापूर तालुक्यातून सर्वात कमी १८ हजार १५० विमा प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. गतवर्षी २०१७-१८ च्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा पीकविमा प्रस्तावाची संख्या १ लाख २५ हजार १७७ ने वाढली आहे. तसेच शेतकऱ्यांनी भरणा केलेला विमा हप्तादेखील १० कोटी ६८ लाख रुपयांनी जास्त आहे. पीकनिहाय विमा संरक्षित क्षेत्र, पीकनिहाय शेतकरी संख्या याबाबत विमा कंपनीने कृषी विभागाकडे माहिती सादर केली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

वर्षेनिहाय पीकविमा योजनेतील प्रस्ताव, भरलेला विमा हप्ता (कोटी रुपये)
वर्षे विमा प्रस्ताव विमा हप्ता
२०१४-१५ १३९०२७ ४.७९
२०१५-१६ ४७२६१७ १७.२४
२०१६-१७ ७६१५५४ ३०.४८
२०१७-१८ ९६६१०७ ३७.५४
२०१८-१९ १०९१२८४ ४८.२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com