धुळे जिल्ह्यात डाळिंब पिकासाठी विमा मंजूर

धुळे जिल्ह्यात डाळिंब पिकासाठी विमा मंजूर
धुळे जिल्ह्यात डाळिंब पिकासाठी विमा मंजूर

देऊर, जि. धुळे : हवामानवर आधारित फळपीक योजना २०१७ अंतर्गत मृग बहार डाळिंब पिकांचा समावेश करण्यात आला होता. या योजनेसाठी रिलायन्स कंपनीची नियुक्‍ती झाली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील एक हजार, ३८५ शेतकऱ्यांना ७ कोटी ६० लाख रुपये विमा कंपनीने मंजूर केले आहेत.

काही शेतकऱ्यांचे डीबीटी प्रणालीनुसार थेट खात्यावर पैसे जमा झाले आहेत. त्यात सध्या जिल्ह्यातील नेर मंडळात हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नेर मंडळात डाळिंब हवामान आधारित पीकविमाअंतर्गत १९० शेतकरी समाविष्ट होते. या १९० शेतकऱ्यांमध्ये ९३ शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे आहेत. त्यात सेंट्रल बॅंकेचे ५८ शेतकऱ्यांनी हा विमा काढला आहे व उर्वरित ३९ शेतकरी बॅंक ऑफ महाराष्ट्रसह इतर बॅंकेचे आहेत. मात्र, नेरच्या सेंट्रल बॅंकेने रिलायन्स इन्‍शुरन्स कंपनीऐवजी इफको कंपनीकडे ५८ शेतकऱ्यांचा तीन लाख, ५४ हजार रुपयांचा पीकविमा २४ जुलै २०१७ ला काढण्यात आला आहे पीकविमा या कंपनीने नाकारला आहे.

काही शेतकऱ्यांनी रोख स्वरूपातही पीकविमा काढला आहे. त्यांचा हिशोब नाही. ही संख्या नेर मंडळातील दोनशेवर आहे. त्याचा शोध सुरू आहे. तूर्त आकडेवारी कमी दिसत आहे.

डाळिंब : हवामानावर आधारित पीकविमा मंजूर मंडळ : मंडळनिहाय शेतकरी संख्या व रक्‍कम

धुळे तालुका मंडळ आर्वी- ८ - ४ लाख ६६ हजार ५०० बोरकुंड - ११ - ६ लाख २९ हजार ५०० धुळे ग्रामीण - ११ - ६ लाख २७ हजार कुसुंबा -३९ - २२ लाख ३८ हजार ५०० लामकानी - १८ - १५ लाख ६५ हजार ६५५ मुकटी - २ - १ लाख ७२ हजार ५०० नगाव बुद्रुक - ७ -५ लाख ३३ हजार नेर - १९० - ८७ लाख २५ हजार ३१५ फागणे- २ - १ लाख ४५ हजार ५०० शिरुड - ७ -५ लाख ३५ हजार ५०० सोनगीर - १० - ५ लाख ५ हजार ५०० साक्री ब्राह्मणवेल- ४ - २ लाख ८३ हजार ५०० दहिवेल - २२ - १४ लाख ४ हजार ५०० दुसाने - ९ - १० लाख १७ हजार कासारे - ३१५ - १ कोटी ६७ लाख, ९७ हजार ३५ कुडाशी - ५ - ३ लाख ६१ हजार म्हसदी प्र. नेर - ३८५ - दोन कोटी दोन लाख निजामपूर - २०- २२ लाख ४४ हजार पिंपळनेर - ४४ -२० लाख ४९ हजार साक्री - २४० -एक कोटी १९ लाख ५१ हजार शिरपूर बोराडी - १ - लाख ११ हजार होळनांथे - १ - पन्नास हजार जवखेडा - १ - ८५ हजार सांगवी - २ - ५ लाख १३ हजार शिंदखेडा बेटावद ३ - दोन लाख ११ हजार चिमठाणे -१४ - १२ लाख २९ हजार दोंडाईचा - ६ - ५ लाख ५७ हजार शेवाडे - ५ - ५ लाख ५७ हजार शिंदखेडा - २ - एक लाख ७० हजार विखरण - १ - एक लाख ४१ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com