agriculture news in marathi, Integrated management can lead to increase sugarcane yield to 100 ton per acer | Agrowon

‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य’
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा योग्य वापर, तणनियंत्रण, रासायनिक व जैविक बेणेप्रक्रिया तसेच पाणी, खतांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास एकरी शंभर टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन वाढीचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, असा सल्ला शिरोली येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष मोरे यांनी दिला.       

आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा योग्य वापर, तणनियंत्रण, रासायनिक व जैविक बेणेप्रक्रिया तसेच पाणी, खतांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास एकरी शंभर टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन वाढीचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, असा सल्ला शिरोली येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष मोरे यांनी दिला.       

पारगावतर्फे आळे येथे श्री मुंजोबा मंदिरात ‘अॅग्रोवन’ व स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लि. यांच्या वतीने ऊस लागवड आणि व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी संभाजी चव्हाण होते. चर्चासत्राला स्मार्टकेम टेक्नाॅलॉजीजचे विभागीय विक्री अधिकारी उदयसिंह कदम, प्रतिनिधी योगेश गरुड, अभिजित पाटील, महेश नेहरकर, संजय चावरे, प्रगतशील शेतकरी विकास चव्हाण, उपसरपंच रामदास तट्टू, विघ्नहर कारखान्याचे संचालक किरण तट्टू, किसन डुकरे, स्मार्ट व्हिलेजचे प्रतिनिधी मंदार जाधव, स्थानिक वृत्तपत्र विक्रेते रवींद्र फाकटकर, सखाराम खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

 सुभाष मोरे म्हणाले, की जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि पाने सशक्त असणे आवश्यक आहे. योग्य बेण्याची निवड, बेणे प्रक्रिया, सुधारित पद्धतीने लागवड आणि शिफारशीनुसार खत आणि पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. चर्चासत्रामध्ये विकास चव्हाण यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी उदयसिंह कदम यांनी महाधनच्या विविध उत्पादनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘अॅग्रोवन’चे वरिष्ठ व्यवस्थापक संभाजी घोरपडे यांनी केले. सूत्रसंचालन वरिष्ठ अधिकारी महेश चौखंडे यांनी केले. आभार उपसरपंच रामदास तट्टू यांनी मानले.
 

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...