agriculture news in Marathi, Integrated management of sugarcane is important: Dr. Bukshi Ram | Agrowon

उसाचे एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे ः डॉ. बक्षी राम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

कोल्हापूर : एकरी दोनशे टन ऊस उत्पादनासाठी उसाचे एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घ्यावेत, असे आवाहन ऊस प्रजनन संस्था कोईमतूरचे संचालक डॉ. बक्षी राम यांनी शिरोळ येथे केले. 

शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘झेप एकरी दोनशे टनाची (दत्त पॅटर्न)’ या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला त्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कोल्हापूर : एकरी दोनशे टन ऊस उत्पादनासाठी उसाचे एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घ्यावेत, असे आवाहन ऊस प्रजनन संस्था कोईमतूरचे संचालक डॉ. बक्षी राम यांनी शिरोळ येथे केले. 

शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘झेप एकरी दोनशे टनाची (दत्त पॅटर्न)’ या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला त्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. बक्षीराम म्हणाले, दत्त कारखान्याने उत्पादन वाढीचा हा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. एकरी दोनशे टन ऊस उत्पादन सहज शक्‍य आहे. मात्र, यासाठी विविध पातळ्यांवर शेतकऱ्यांना काम करावे लागेल. उसाच्या चांगल्या जाती निवडणे, त्यावर ब्रीजप्रक्रीया करणे, सेंद्रीय पदार्थांचा सातत्याने जमिनीत वापर करून सेंद्रीय कर्ब वाढविणे, रुंद सरी पद्धत वापरून रोप लागवड करणे, तण व फवारण्यांचे योग्य नियोजन करणे, ठिबकचा प्रभावी वापर करणे, रोग किडीचे योग्य वेळी नियंत्रण करणे, खतांचा संतुलित वापर करून योग्य व्यवस्थापन करणे या बाबी उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर योजनेची माहिती दिली. या वेळी डॉ. जुगुळ रेपाळे, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, सिदगोंडा पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, बाळासाहेब हलसवडे, संजय पाटील, श्री. माने, बाळासाहेब कोळी, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, विश्‍वजीत शिंदे, ए. एस. पाटील, आदीसह विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते. डॉ. बक्षी यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्यांच्या वतीने अध्यक्ष श्री. पाटील यांनी सत्कार केला.

इतर बातम्या
पशुपालकांना संस्थांनी मदत करावी ः शरद...निमगाव केतकी, जि. पुणे   ः सध्याच्या...
परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे...परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या...
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या...अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत...
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटकावाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा...
वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षाअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी...
कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा...नांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी...
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या...मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत...
कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने...नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते...
सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः...शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण...
रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम...पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या...
नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे...नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १...अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे...
यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभयवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ...
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी...बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलंकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं...