agriculture news in marathi, Inter- corp demonstration of 84 villages under Pokhra | Agrowon

पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक प्रात्यक्षिक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये कापूस- मूग, सोयाबीन-तूर अशी आंतरपीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या गावांतील शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून पीक लागवड, कीड, रोग, खत व्यवस्थापन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये कापूस- मूग, सोयाबीन-तूर अशी आंतरपीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या गावांतील शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून पीक लागवड, कीड, रोग, खत व्यवस्थापन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पोकराअंतर्गत जिल्ह्यातील ३९ गाव समूहातील २७५ गावांची निवड करण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये ९ समूहातील ८४ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गंगाखेड तालुक्‍यातील १२ गावांमध्ये ग्रामकृषी संजीवनी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उर्वरित गावांमध्ये लवकरच या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांमार्फत गावातील कामांचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.

हवामान अनुकूल शेतीशाळा या बाबी अंतर्गत ८४ गावांमध्ये प्रत्येकी दोन या प्रमाणे १६८ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. आठवड्यातील ठराविक दिवशी प्रात्यक्षिक घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन लागवड, कीड, रोग, खत व्यवस्थापन तंत्रज्ञान आदीं बाबत माहिती दिली जाणार आहे. आंतरपीक प्रात्यक्षिकांसाठी सोयाबीनच्या एमएयूएस ७१, तुरीच्या बीडीएन ७११, मुगाच्या उत्कर्षा या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.४० आर क्षेत्राचे एक प्रात्यक्षिक असणार आहे, असे पोकराचे प्रकल्प सहायक एम. एस. लांबडे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...