agriculture news in marathi, interaction with farmers,bhandara, maharashtra | Agrowon

`शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आर्थिक शिस्त जपण्याची गरज`
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018
भंडारा  ः शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आर्थिक शिस्त जपली नाही, तर त्यांची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. बड्या कंपन्यांप्रमाणे प्रत्येक खर्चाचा लेखाजोखा शेतकरी कंपन्यांना ठेवावा लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. 
 
आसगाव (ता. पवनी) येथील चौरास शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांशी जिल्हाधिकारी दिवसे यांनी बुधवारी (ता.२४) संवाद साधला. उद्योग वाढविण्यासाठीच्या टिप्स त्यांनी या वेळी सभासदांना दिल्या.
 
भंडारा  ः शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आर्थिक शिस्त जपली नाही, तर त्यांची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. बड्या कंपन्यांप्रमाणे प्रत्येक खर्चाचा लेखाजोखा शेतकरी कंपन्यांना ठेवावा लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. 
 
आसगाव (ता. पवनी) येथील चौरास शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांशी जिल्हाधिकारी दिवसे यांनी बुधवारी (ता.२४) संवाद साधला. उद्योग वाढविण्यासाठीच्या टिप्स त्यांनी या वेळी सभासदांना दिल्या.
 
जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले, की नुसत्या चहा, कॉफीवरील खर्चदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यावरील खर्चाचे देखील नियोजन कंपनी प्रमुखांना करावे लागेल. त्यानंतरच खर्च, उत्पन्नाचा ताळेबंद जुळणार आहे. अशाप्रकारचा क्षुल्लक खर्च जरी कंपनीच्या खात्यात सातत्याने टाकत राहिला आणि तो दुर्लक्षित राहिला तर नुकसान सोसावे लागते. बड्या कंपन्यांनी अशाप्रकारची शिस्त जपल्यानेच त्या फायद्यात आहेत. अशाप्रकारची आर्थिक शिस्त शेतकरी कंपन्यांना गरजेची असल्याचे ते म्हणाले.
 
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कंपनी सभासदांशी संवाद साधताना त्यांना ‘बिजनेस टिप्स’ दिल्या. कृषी पदवीधर असल्याने जिल्हाधिकारी होण्यापूर्वी मी रोपवाटिका व्यवसायात होतो. या व्यवसायात नफ्याचे मार्जिन चांगले असल्याने अशाप्रकारच्या व्यवसायात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी लक्ष्य घालण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला. रोपवाटीकेकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. त्यामुळे मजुरांवरील खर्च वाचतो, असेही सांगण्यास ते विसरले नाही.
 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, उपविभागीय अधिकारी एस. पी. लोखंडे, चौरास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अनिल नौकरकर, पवनी तालुका कृषी अधिकारी ए. डी. गजभिये, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे कृषी पणन तज्ज्ञ योगेश खिराळे यांची या वेळी उपस्थिती होती. 
 

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...