agriculture news in marathi, interculture operation in banana, jalgaon, maharashtra | Agrowon

केळीबागेत आंतरमशागती सुरू
चंद्रकांत जाधव
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

कांदेबाग यंदा जोमात अंकुरली आहे. नांग्या फारशा भराव्या लागलेल्या नाहीत. आंतरशागतही पूर्ण झाली आहे. लवकरच खते देण्याचे काम हाती घ्यावे लागेल.
- प्रवीण सपकाळे, फुपणी, जि. जळगाव

 

जळगाव : जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या कांदेबाग जोमात आहेत. सध्या निरभ्र वातावरण असल्याने त्यात मशागत सुरू आहे. वातावरणात गारवा असल्याने आंतर मशागत करून त्याचे सिंचन काही शेतकऱ्यांनी बंद केले आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरपासून कांदेबाग केळी लागवडीस सुरवात केली जाते. चोपडा, जळगाव, भडगाव या तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक कांदेबाग असतात. रावेर,  यावल, मुक्ताईनगरमध्ये कमी प्रमाणात कांदेबाग लागवड केली जाते. लागवडीसाठी अनेक शेतकरी कंदांना पसंती देत आहे. आणखी महिनाभर कांदेबाग लागवड सुरू राहील.

तापीकाठावर हलक्‍या, पांढऱ्या जमिनीतील कंद अधिक जोमात अंकुरतात आणि वाढतात म्हणून चोपडा, जळगावमधील तापीकाठावरील गावांमध्ये जामनेर, भडगाव येथून केळीचे कंद लागवडीसाठी आणले जात आहेत. वाहतूक व इतर मजुरीसह एक कंद चार रुपयांना पडत आहे.

१६ सप्टेंबरनंतर जळगाव, चोपडा, यावल भागांत परतीचा पाऊस झाल्याने या काळात लागवड केलेल्या कांदेबागाला त्याचा लाभ झाला. कंदांना सिंचनाची गरज नव्हती. अंकुरणाची प्रक्रियाही व्यवस्थित झाली. त्यामुळे नांग्या भरण्याची यंदा फारशी गरज नाही. एरवी १७ ते १८ टक्के कांदेबागांचे कंद वातावरणातील उष्णता व इतर कारणांमुळे अंकुरत नाहीत. ते काढून पुन्हा नवीन कंदांची लागवड करावी लागते. त्यात आणखी खर्च लागतो. पण यंदा नांग्या भरण्याचा खर्च परतीच्या पावसामुळे वाचल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसामुळे कांदेबाग केळीमध्ये तण वाढले होते. ते दूर करण्यासह मुळांना खेळती हवा मिळावी यासाठी वाफसा मिळताच आंतरमशागतीचे काम जिल्ह्यात वेगात सुरू झाले. वाफसा चांगला मिळाल्याने बैलजोडीने मशागत सुकर झाली. शेते भुसभुशीत झाली असून, आता शेतकरी रासायनिक खते देण्याची तयारी करीत आहेत.

सध्या वातावरणात गारवा असल्याने व आंतरमशागतीसाठी अडथळा येऊ नये म्हणून सूक्ष्म सिंचन यंत्रणा हटविली आहे. सध्या तरी सिंचनाची फारशी गरज नाही. काळ्या कसदार जमिनीत बऱ्यापैकी ओलावा आहे.

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...