agriculture news in marathi, Interim anticipatory bail in 13 high court judges | Agrowon

उच्च न्यायालयात १३ संचालकांना अंतरिम अटकपूर्व जामीन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार आणि तत्कालीन सभापती दिलीप माने यांच्यासह १३ जणांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात का होईना प्रचाराची खिंड लढवण्यासाठी माने यांना संधी मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी हिरज, देगाव भागात प्रचारसभा घेऊन प्रत्यक्षात कामासही सुरवात केली आहे.

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार आणि तत्कालीन सभापती दिलीप माने यांच्यासह १३ जणांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात का होईना प्रचाराची खिंड लढवण्यासाठी माने यांना संधी मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी हिरज, देगाव भागात प्रचारसभा घेऊन प्रत्यक्षात कामासही सुरवात केली आहे.

सोलापूर न्यायालयाने या प्रकरणातील १३ संचालकांचा अटकपूर्व जामीन २२ जून रोजी नामंजूर केला होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर झाली. त्यांनी माने यांच्यासह इंदुमती अलगोंडा, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, ऊर्मिला शिंदे, सोजर पाटील, उत्तरेश्‍वर भुठ्ठे, राजशेखर शिवदारे, बसवराज दुलंगे, सिद्धाराम चाकोते, प्रभाकर विभूते, अप्पाराव उंबरजे, सिद्धाराम यारगळ यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणी विशेष लेखापरीक्षक डोके यांनी पणन संचालकांना सादर केलेल्या अहवालात या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा निष्पन्न होत नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या विरोधकांना निवडणूक लढविण्यास अडथळा यावा, यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आम्हाला या प्रकरणात गुंतविले,  असे प्रतिपादन उच्च न्यायालयात करण्यात आले.

पुढील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात संचालकातर्फे ॲड. अशोक मुंदर्गी, ॲड. सारंग आराध्ये, ॲड. जयदीप माने, ॲड. रितेश थोबडे, ॲड. अभिजित इटकर, सरकारतर्फे अॅड. पेडणेकर तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. राजीव चव्हाण यांनी काम पाहिले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...