धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस

धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस

जळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व रावेर मतदारसंघांत उमेदवार कोण असतील, या संदर्भात संकेत मिळू लागले असून, जळगावमधून पुन्हा एकदा ए. टी. पाटील व रावेरातून रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम राहणार आहे. यातच धुळे मतदारसंघात भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात उघड काम करण्याचा पवित्रा घेतला आहे.  जळगाव क्षेत्राचे खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच गोत्यात आली होती. परंतु उमेदवारीसंबंधी ते दिल्लीत ठाण मांडून होते. मोठे मताधिक्‍य मिळविणारे खासदार म्हणून पाटील यांनी खानदेशात विक्रम केला आहे. त्यांना पक्षाकडून डावलले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे रावेरातही विद्यमान खासदार रक्षा खडसे याच उमेदवार असतील, की नाही हा प्रश्‍न आहे. कारण माजी खासदार तथा रावेरचे आमदार हरिभाऊ जावळेंसह आता भुसावळमधील अजय भोळे यांचे नावही या मतदारसंघासाठी मध्येच पुढे केले जाते. परंतु खासदार खडसे यांनी आपल्या मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. नेतृत्वाकडून खडसे यांच्या उमेदवारीबाबत हिरवा कंदील मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.   रावेर मतदारसंघ कॉँग्रेसला रावेर मतदारसंघ आघाडीमध्ये कॉँग्रेसला जाईल, असे निश्‍चित मानले जात असून, या मतदारसंघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारीदेखील निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले. केंद्रात मंत्रिपद देणारा जळगाव मतदारसंघ  जळगाव लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा व चर्चेत राहिला आहे. भाजपचे डॉ. गुणवंत सरोदे, एम. के. पाटील हे सलग दोनदा निवडून आले. तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या मतदारसंघातून कॉँग्रेसचे विजय नवल पाटील, भाजपचे एम. के. पाटील हे केंद्रात मंत्रीही झाले आहे. तिसऱ्यांदा मात्र या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मागील सहा पंचवार्षिकमध्ये मिळालेली नसल्याचे जाणकार सांगतात.  धुळे मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. भामरे यांना पराभूत करण्यासाठी भाजपमधीलच काही पदाधिकारी सरसावले आहेत. या मतदारसंघात पुढे अंतर्गत कलह अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. अंतर्गत धुसफूस सुरू असल्याने धुळ्यासह जळगाव भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com