भारतातील भात उत्पादन १०८ दशलक्ष टनांवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली ः भारतात यंदा (२०१७-१८) १०८ दशलक्ष टन भात उत्पादन होणार असल्याचा अंदाज अांतरराष्ट्रीय धान्य परिषदेने व्यक्त केला अाहे. अनियमित पावसामुळे काही प्रमाणात भारतातील भात उत्पादनावर परिणाम झाला असल्याचेही परिषदेने जाहीर केलेल्या मासिक अहवालात नमूद केले अाहे. भारतातील भात उत्पादनात घट झाली तर त्याचा परिणाम जगातील एकूण भात उत्पादनावर होतो. जगात यंदा भात उत्पादन ४८१.१ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त केला अाहे.
 
गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात जगात ४८२.७ दशलक्ष टन भात उत्पादन होईल, असे म्हटले होते. अाता सुधारीत अंदाज अहवालात भात उत्पादनात घट होणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. जगात यंदा भाताचा वापर ४८४.६ दशलक्ष टन राहण्याची शक्यता अाहे. जगात भाताचा वापर कमी राहील.
 
परिणामी साठा अधिक राहणार अाहे. यंदा जगात १२०.२ दशलक्ष टन भातसाठा राहणार अाहे, असा अंदाज धान्य परिषदेने व्यक्त केला अाहे. अशियातील देशांतून मागणी चांगली राहणार असल्याने जगातील भात निर्यात वाढून ती ४३.२ दशलक्ष टनांवर पोचेल, असे परिषदेने अहवालात म्हटले अाहे. 
जगातील गहू उत्पादन वाढणार
जगातील गहू उत्पादन वाढणार अाहे. अाॅस्ट्रेलियात गहू पिकाचे नुकसान झाले अाहे. मात्र, युरोपीय देश, अमेरिका अाणि युक्रेनमध्ये उत्पादन वाढणार असल्याने ही तूट भरून निघण्याची शक्यता अाहे. जगात एकूण गहू उत्पादन ७४८.५ दशलक्ष टन होईल. तर मका उत्पादन १.०३४ अब्ज टनांवर पोचणार अाहे. मात्र, चीनमधून उद्योगांकडून मागणी अधिक राहणार असल्याने जगातील मका साठ्यात घट होऊन तो २०२.६ दशलक्ष टनांपर्यंत खाली येईल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय धान्य परिषदेने व्यक्त केला अाहे.
 
जगातील २०१७-१८ मधील धान्य उत्पादन (दशलक्ष टनांमध्ये)
 
उत्पादन २०७५
व्यापार ३५९
वापर २१०४
शिल्लक साठा ४९३
निर्यात १७२

स्राेत - अांतरराष्ट्रीय धान्य परिषद

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com