agriculture news in marathi, International Mango Conference to be held in Vegurla from 8 may | Agrowon

वेंगुर्ले येथे ८ पासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर ऍडव्हॉन्मेंट ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्सेस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ८ ते ११ मे या कालवधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद होत आहे.

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर ऍडव्हॉन्मेंट ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्सेस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ८ ते ११ मे या कालवधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद होत आहे.

प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची स्थापना १९५७ मध्ये झाली. त्यानंतर येथे आंब्यावर महत्त्वपूर्ण संशोधन झाले. आंबाविषयक महत्त्वपूर्ण संशोधनात्मक योगदानाबद्दल तसेच संशोधन विषयाच्या माहितीचे जागतिक पातळीवर देवाणघेवाण करून बदलत्या वातावरणात शाश्‍वत आंबा उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या संकल्पनेतून प्रथमच जिल्ह्यात अशी परिषद होत आहे. यात देशविदेशांतून १५० हून अधिक कृषी शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. 

या परिषदेदरम्यान विविध विषयांवर तांत्रिक सत्र होतील. मुख्यत्वेकरून जागतिक पातळीवर आंब्याची सद्यःस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन, शाश्‍वत उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान, पीक संरक्षण, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी अर्थशास्त्र, आंबा पिकातील निर्यात इत्यादी विषयांचा समावेश आहे. या निमित्ताने आंबा उत्पादन करणाऱ्या जगभरातील शास्त्रज्ञ, आंबा बागायतदार, आंबा व्यापारी विविध विषयांचे विद्यार्थी यांना आंबा उत्पादनाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यात आंबा बागायतदार व शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र होणार आहे.

या वेळी कृषिविषयक प्रदर्शनही होईल. यात २०० हून अधिक आंब्याच्या जाती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आंब्यामध्ये यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने विविध यंत्र सामग्रीचे प्रात्यक्षिकही होणार आहे. याशिवाय विविध कृषी विषयक प्रशिक्षणे, मत्स्य संवर्धन प्रशिक्षणांचा यात समावेश असेल.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...