परदेश अभ्यास दाैऱ्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

परदेश अभ्यास दाैऱ्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
परदेश अभ्यास दाैऱ्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने परदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज दाखल केले़, परंतु हा दौरा केव्हा होईल, हे कृषी विभागाकडून स्पष्टपणे सांगितले जात नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. या दौऱ्यासंबंधी कृषी विभाग व लोकप्रतिनिधींनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

या दौऱ्यासाठी सुमारे २०० अर्ज आले आहेत. रावेर, यावल, पाचोरा भागातील अर्ज अधिक आहेत. इस्त्राईल, युरोप व ऑस्ट्रेलिया येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दौऱ्याचा खर्च सरकार शेतकरी निम्मा निम्मा करतील, असेही निर्देश देण्यात आले होते. मागील वर्षी अर्ज मागविण्याची प्रक्रिया झाली. नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात आली, परंतु त्यानंतर दौऱ्याचा विषय मागेच पडला.

शेतकरी चौकशीसाठी तालुका व जिल्हा स्तरावरील कृषी विभागात जातात, परंतु त्यांना समधानकारक उत्तर दिले जात नाही. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. मागील दोन वर्षांपासून शेतकरी अभ्यास दौरा झालेला नाही. अर्ज सादर करणे, वयाचे प्रमाणपत्र यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागला. तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक खर्च आला, तसेच वणवणही करावी लागली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com