agriculture news in marathi, interrupted power supply affects on crops, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने उन्हाळी पिके वेठीस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018
पाण्याची उपलब्धता आहे. मात्र, सातत्याने विद्युत खंडित होत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे पाणी असूनदेखील शेतीला वेळेत पाणी देता येत नाही. याचा परिणाम पिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने कृषिपंपाला लागणारा विद्युत पुरवठा विनाखंडित द्यावा.
- तात्यासो नागावे, खटाव, जि. सांगली
सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी उपलब्ध असून, सातत्याने विद्युत खंडित होत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी अडथळे निर्माण होऊ लागले आहे. याचा फटका उन्हाळी पिकांना बसू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
सांगली जिल्ह्याला कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी शेतीला वापरले जाते. सध्या दोन्ही नदीत पाणी मुबलक आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी, महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतीपंपाच्या विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करसत करावी लागते आहे. उसाबरोबर केळी, भाजीपाला पिकासह इतर पिकांच्या वाढीवर परिमाण होण्याची शक्‍यता आहे. 
 
जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिके दुपार धरू लागली आहेत. भाजीपाला, फळभाज्या त्याचबरोबर उसाच्या खोडवा पिकांवरही उन्हाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यांची वाढ खुंटू लागली आहे. याकाळात वाढत्या भारनियमनांचा फटका बसत आहे.  
 
मुळात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा चार दिवस सकाळी आणि तीन दिवस रात्रीच्या वेळी होतो आहे. त्यातच महावितरणाकडून सातत्याने वीज खंडित होते आहे. शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीशी संपर्क केला असता कंपनीचे अधिकारी सांगतात, की फीडरवर अतिरिक्त दाब आल्याने वीजपुरवठा आपोआप खंडित झाला आहे. सुमारे एक ते दोन तास वेळ लागेल. मुळात दहा तास मिळणारी वीज सात ते आठ तास मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
 
उन्हाच्या तीव्रतेने  शेतजमीन  तापल्याने पाटाने सोडलेले पाणी पुढे  न सरकल्याने पुन्हा पाणी तिथेच जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची किरकोळ टंचाई जाणवत आहे.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...