agriculture news in marathi, interrupting power supply of transformers, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमधील तीन हजार रोहित्रांचा वीजपुरवठा केला खंडीत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017
कपाशीचे पीक पुरते खराब झाल्याने अर्थकारण कोलमडले आहे. त्यात आता तीन हजार रुपयांसाठी वीज कंपनी वीज खंडित करून वेठीस धरीत आहे. शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रकार शासन करीत आहे. 
- अरुण आसाराम जाधव, शेतकरी, डोमगाव, जि. जळगाव.
जळगाव ः थकबाकी वसुलीसाठी कृषिपंपांना वीजपुरवठ्यासाठी शेतशिवारांमध्ये उभारलेल्या सुमारे तीन हजार रोहित्रांचा वीजपुरवठा मुख्य वीज वाहिनीवरूनच महावितरणने बंद केला आहे. यामुळे कृषिपंप बंद झाले असून, सिंचनाचे काम ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 
 
शुक्रवारपासून (ता.२२) कृषिपंप वीज तोडणी मोहीम सुरू झाली. याबाबत कुठलीही सूचना दिली गेली नाही. जळगाव व धरणगाव तालुक्‍यात शुक्रवारी सकाळीच वीज कंपनीचे कर्मचारी शिवारांमध्ये आले. त्यांनी मुख्य वाहिन्यांवरून रोहित्रांना होणारा वीजपुरवठा बंद केला. रोहित्रच बंद झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद झाला. एका गावाच्या शिवारात सुमारे चार कर्मचाऱ्यांनी ही वीज तोडणी मोहीम राबविली.
 
विशेष म्हणजे सध्या सकाळी वीज मिळत असल्याने शेतकरी सिंचनासाठी शेतात केले होते. याच वेळी कर्मचारी कुठलीही सूचना न देता थेट रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करू लागले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पाचोरा, पारोळा, यावल तालुक्‍यांतही काही भागात हे वीज तोडणीचे प्रकार झाले आहेत. शनिवारीही (ता.२३) ही मोहीम राबविली. 

कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जोपर्यंत तीन हजार रुपये भरणार नाहीत, तोपर्यंत वीज सुरू होणार नाही, असे निर्देश वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. त्यासाठी विजबिल भरण्याची सुविधा रविवारीही (ता.२४) वीज कंपनीच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये देण्यात आली. जळगाव शहरात कोंबडी बाजारनजीकच्या कार्यालयात ही व्यवस्था केली होती. 

वीज सूचना न देता का तोडली, अशी विचारणा ज्या वेळी वीज कंपनीच्या जळगावमधील कार्यालयात व काही जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधून केली त्या वेळी त्यांनी आम्हाला वरून आदेश आले आहेत. आम्ही काहीही करू शकत नाही, असे सांगून किमान तीन हजार रुपये भरा व वीजपुरवठा सुरू करून घ्या, असे स्पष्ट केले. आजघडीला ज्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही ते शेतकरी अडचणीत आले आहेत. 

 
सूचना न देता कृषिपंपांची वीज बंद केल्याचा मुद्दा काही शेतकऱ्यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी सांगितला. या शेतकऱ्यांना राज्यमंत्री पाटील यांनी बागायतदारांना तीन हजार रुपये रक्कम मोठी नाही. भरून टाका, असे सांगून आपण काहीही करू शकत नाही, असे सांगत असमर्थता दाखविली. 
टॅग्स

इतर बातम्या
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मराठवाड्याला पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून...नांदेड  ः मराठवाड्याच्या वाट्याचे कृष्णा...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...