agriculture news in marathi, inugration of solar energy based electricty supply system, mumbai,maharashtra | Agrowon

ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना मोठा लाभ : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व लोकाभिमुख अशा महत्त्वाकांक्षी तीन योजना सुरू केल्या असून, याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना व जनतेला मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व लोकाभिमुख अशा महत्त्वाकांक्षी तीन योजना सुरू केल्या असून, याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना व जनतेला मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौरऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स व शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या तीन योजनांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री चंद्रकात पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, दीपक केसरकर, विजय शिवतारे, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की ऊर्जा विभागातर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्वसामान्यांना उपयुक्त असे निर्णय घेतले जात आहेत. उद्‌घाटन झालेल्या तीनही योजना या महत्त्वपूर्ण असून पर्यावरणपूरक अशा आहेत. या सर्व योजनांमुळे येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ लाख सौरपंपांना मान्यता दिली आहे. शेतकरी केंद्रीत अशा या योजना असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना  होईल.

विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास निश्चितच वाचेल, तसेच इंधनाचा भारदेखील कमी होईल. मोटर वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या इलेक्‍टि्कल वाहन तयार करीत आहेत. त्यामुळे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला चांगली मागणी आहे. राज्यातील विद्युत अभियंता, पदविकाधारक तसेच आयटीआयच्या युवकांना ही विद्युत स्टेशन देण्याबाबतचा निर्णयदेखील महत्त्वाचा आहे. रोजगाराची मोठी संधी यातून मिळणार आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा अधिक वीज निर्माण करण्याची क्षमता असलेले आपले राज्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘मागेल त्याला मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी’
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या योजना आहेत. निती आयोगाने कौतुक केलेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना असून अशा प्रकारची ही देशातील पहिली योजना आहे. राज्यातील मागेल त्या शेतकऱ्याला या योजनेतून लाभ दिला जाईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, की या सौर वाहिनीमुळे महत्त्वाचे फायदे होऊ शकतात. यामध्ये विजेवरील खर्च, वीजपुरवठ्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. विभागाने ५ लाख १८ हजार वीज जोडण्या दिल्या असून उर्वरित दोन अडीच लाख जणांनादेखील जून २०१९ अखेर वीजजोडण्या दिल्या जातील. विद्युत पदविकाधारक, आयटीआयच्या २३ हजार विदयार्थ्यांना मार्च २०१९ पर्यंत विविध गावांमध्ये ग्राम मॅनेजर म्हणून काम मिळेल. प्रती विद्युत कनेक्शन ९ रुपये प्रमाणे त्यांना देखभाल दुरुस्ती खर्च दिला जाईल.

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...