agriculture news in marathi, investigation order for crop loss due to rain | Agrowon

पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश
ज्ञानेश उगले
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नाशिक : कर्जमाफीचा उडालेला गोंधळ, त्यातच अवकाळी पावसाने पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी चिंताक्रांत असताना पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

मात्र ऑक्टोबर उलटल्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात अवकाळी पावसाने सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यंदा जूनपासूनच जिल्ह्यात वरुणराजाने कृपादृष्टी करत जिल्ह्याला चांगलेच झोडपले.

नाशिक : कर्जमाफीचा उडालेला गोंधळ, त्यातच अवकाळी पावसाने पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी चिंताक्रांत असताना पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

मात्र ऑक्टोबर उलटल्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात अवकाळी पावसाने सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यंदा जूनपासूनच जिल्ह्यात वरुणराजाने कृपादृष्टी करत जिल्ह्याला चांगलेच झोडपले.

चांगल्या पावसामुळे यंदा चांगले उत्पादन होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांंच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. जिल्ह्यातील ६६२ गावांतील ४८ हजार ९८४ शेतकऱ्यांचे अवकाळीने नुकसान झाले.
जिरायत क्षेत्रातील भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या पिकांचे १२ हजार ८८८.५५ हेक्टर तर बागायती क्षेत्रातील कांदा, ऊस व भाजीपाला या पिकांचे २६३९.६४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

फळपीक क्षेत्रातील द्राक्ष पिकाला मात्र सर्वाधिक फटका बसला. ऐन छाटणीच्या व झाडाने फूल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली. तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला. १० हजार २७४ हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याने पीक पंचनामे करण्यात आले नव्हते. ऑक्टोबर महिना संपत आल्यानंतर शासनाने पंचनाम्याचे आदेश दिल्याने आता यंत्रणा कामाला लागणार आहे.

पंचनाम्याबाबत संभ्रम
शासन निर्देशानुसार ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येतात. मात्र, सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे. त्यातही आता ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यामुळे किती शेतकरी नुकसानभरपाईस पात्र ठरणार याबाबतही संभ्रमच आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...